पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पूर्वीच्या राज्यांत ईस्ट इंडिया कंपनी (पूर्व हिंदुस्थान मंडळी ह्मणजे कंपनी सरकार) ईचीं हिंदुस्थानांत जी ठाणी घे- तलीं होतीं, ती परत द्यावीं. फ्रान्स देशाचे सरकाराशींही त्यानें तसाच तह के- त्या वेळेस फ्रेंच यांचा मुख्य कारभारी क्यार्डिनल माझेरीन होता, त्यानें अशी युक्ति केली कीं, काम्वेल याचा फार सन्मान राखिला. काम्वेल याचा स्वभाव उ तावीळ, असे जाणून त्यानें बळाचें वोलणें सोडून मृदु भा षण आरंभिलें, आणि या रीतीने दोघांचीही कामे झाली. स्पेन देशचे दरबारानेही त्याचा स्नेह संपादन करें- ण्याविषयी प्रयत्न केला, पण तो सिद्धीस गेला नाही. त्या विशाळ राज्याने कांही वर्षांपूर्वी सर्व युरोप खंडांतले स्वातं- व्य घालवावयाचे भय घातले होते; परंतु या समयीं त्यास आपलेही तें संरक्षण करावयाची शक्ति राहिली नव्हती. काम्वेल यास इतर राज्यांचे स्थितीचें विशेष ज्ञान नव्हते; ह्मणून भिऊन तो त्या दरबारचा मोड करावयाकरितां, फ्रें- च सरकाराशीं साथी झाला. त्याने स्पेन दरबारच्या ने- दर्लंड देशांत मुलूख होता, तो घ्यावयाकरितां साहा हजार फौज फ्रेंच लोकांचे स्वाधीन केली, आणि त्यांनीं त्याच्या आश्रयानें विजय पावून काम्वेल यास डंकर्क शहर दिले, जें तेव्हांच त्यांनीं स्पानियार्ड लोकांपासून घेतले होतें. काग्वेल याने समुद्राचे वाटेनें स्पेन दरबाराचा अभि मान चांगल्या रितीने घालविला: ल्वेक ह्मणून एके ग्रहस्थानें डच लोकांस फार दिवस बेजार केले होते, आणि त्याची सर्व युरोप खंडांत कीर्ति झाली होती, त्यानें स्पेन दे- शचे दरबारात फार भयभीत केलें. मग अरमार घेऊन