पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ कांनी एक युक्ति केली; ती वास्तविक असे खचित ठाऊक आहे ह्मणून बरें, नाही तर आतां खरी वाटायाची नाहीं. ती बंदुकेचे दारूनें काम करायाची युक्ति; जीपेक्षां अधिक वाईट कल्पना मनुष्याचे मनांत कधीही आली नसेल. मेरी राणीस क्याथोलिक धर्माचा फार अभिमान होता, तिचा मुलगा जेम्स हें एक कारण; आणि याचें लहानपणीं कांहीं त्या धर्माचें अगत्य दाखविलें होतें, त्यावरून सर्व क्या- थोलिक यांस अशा होती कीं, हा कांहीं तरी आपले पक्षास साहित्य करील; परंतु तें तसे झाले नाहीं, आणि राजा उघड बोलू लागला की, रोमनक्याथोलिक याविषयी, जे इलिझाबेथ राणीनें कायदे केले आहेत त्यांप्रमाणे मी वर्तेन. अशी त्याची प्रतिज्ञा ऐकून त्यांस क्रोध आला; आणि त्यांनीं निश्चय केला कीं, पार्लमेंट यांच्या दोन्ही सभा एकदांच नाहींशा कराव्या. मग मोठ्या कुटुंबांतला असा एक शाहाणा राबर्ट क्येटस्वी ह्मणून होता, त्यानें युक्ति काढिली कीं, बंदुकीची दारू एखादे ठिकाणी अशी भरून ठेवावी, कीं जीस आग लाविली असतां राजा आणि पार्लमेंट यांतले सर्व गृहस्थ हे सर्व एकदांच मरून जातील. हा बेत फार भयंकर दिसतो, परंतु सर्वांनी एक मसलत करून तो गुप्तपणीं सिद्धीस न्यावयाचा निश्चय केला होता. पुढे दोन महिन्यांवर पार्लमेंट याची सभा व्हावयाचा समय राहिला होता, तेव्हां त्यांनीं त्या सभेच्या घराजवळ एक घर होतें, तें पर्सी याचे नांवानें भाड्याने घेतलें, प्रथम त्यां- नीं पार्लमेंट याचे घरापासून आपले घरापर्यंत जमिनींतून वाट खणायाचें काम आरंभिले; ते जेव्हां तीन यार्ड जाड