पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हैनेस (ह्मणजे हजरत) हा किताब धारण करावा. या रीतीनें त्याची सत्ता लंडन शहरांत आणि राज्यांतले दुसरे सर्व ठिकांणीं प्रसिद्ध झाली. ज्यास पूर्वी कोणी पुसत नव्हता. असा हलका मनुष्य पहिल्याने आपले उपयोगी लहान लहान उद्योग करून, पुढे मोठमोठे पराक्रम करून, त्रेपन्नावे वर्षी अशी उत्कृष्ट सत्ता पावला. त्याचा काम्वेल याचे संपत्तिकाळी आणि विपत्तिकाळी ज्यानीं अंतर केले नव्हते, अशे फौजेचे सर्व अंमलदारांस त्यानें प्रतिवर्षी एक हजार पौंड बैठा पगार देऊन आपले प्रधान नेमिले. फौजेमुळे आपणास इतका मोठेपणा प्राप्त झाला, आणि तीस राजी न राखिली असतां आपला नाश होईल, असें जाणून तो तिला एक महिन्याचा पगार अगाऊ देत असे. त्यानें कोठींत पुष्कळ पुरावा केला होता, आणि तो सरकारी पैसा मोठ्या बंदोबस्तानें खर्चीत असे. उद्योग, सूक्ष्म दृष्टि, आणि दृढ निश्चय, असा होता कीं, को- णते एखादें वंड झाले, किंवा त्याचे शरीराचा घात करण्या- चा कोणी उद्योग आरंभिला. ह्मणजे तें व्यास पूर्वीच कळावें. बाहेरचे राजांशी त्याने आपले गुणाप्रमाणेच व्यवहार ठे- विला होता; आणि कांहीं दिवसपर्यंत तो चांगला चालत होता. डच लोकांचा बहुतवेळ पराजय झाला; आणि त्यांचे व्यापाराचाही संक्षेप होत आला; ह्मणून यांनी शेवटीं तहाविषयीं प्रार्थना केली, ती काम्वेल यानें पुढे लि हिलेला करार करून घेऊन मान्य केली. तो करार हा कीं, इंग्लिश लोकांचें निशाण पाहिले की त्यास मान द्यावा, राजाचा पक्ष सोडून द्यावा, पूर्वी जो खर्च झाला त्या सर्वांच- दल इंग्लिश लोकांस पंच्याशीं हजार पौंड द्यावे, आणि