पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ तो जाणून होता की, राज्य कारभार चालविण्याची या लोकांमध्यें शक्ति नाहीं, ह्मणून हे सर्व कारभार आपलेवर टाकितील, किंवा अगदीं सोडून देतील. या त्याच्या भवि प्याप्रमाणेच ते वर्तले. त्या विलक्षण सभेमध्ये एक चामडें- विक्या प्रेझगाड बेर्बोन नांवाचा होता; त्यावरून त्याचें बेर्वो- न पार्लमेंट असे नांव पडलें होतें. केवळ जे हलके लोक होते, तेही या मूर्ख राज्य रीतीची निंदा करूं लागले. तें पार्लमेंट सक्षैतील कितीएक सभासदांस समजलें; मग लागलीच त्यांनी स्वतः एकीकडे सभा केली. आणि पर- स्परांस ह्मणूं लागले की, या सभेस फार दिवस झाले. मग सर्व संमतानें रौझ ह्मणून एक होता, त्यास आपला मुख्य करून त्वरेनें काम्वेल याजवळ गेले, आणि बोलले कीं, आपले सत्तेचा आपण स्वीकार करावा. त्यानें ती मोठ्या संतोषाने घेतली, परंतु कितीएक सभासदांनी आग्रह धरि ला आहे असें ऐकून, त्यानें कर्नल वैट ह्मणून होता, त्यास सांगितलें कीं, तुझी जाऊन त्या सभेत जे असतील त्यांस काढून टाकावें. तो गेला त्या वेळेस त्यांनी मोयर या नांवाच्या एके गृहस्थास मुख्य केला होता; त्या वेळेस कर्नल यानें जाऊन त्यांस विचारिलें; "तुझी एथें काय करितां.” मोयर यानें स्वस्थ चित्ताने उत्तर दिलें कीं, “आह्मी ईश्वरास शोधितों." कर्नल ह्मणाला, "तर तुझी दुसरें कोठें जा, कारण ईश्वर येथें बहुत वर्षांपासून नाहींसा झाला आहे, असे माझे बुद्धीस येतें.” पार्लमेंट सभेची उगीच छाया मात्र होती, या रीतीने काढून टाकिल्या- वर, फौजेचे सरदारांनी ठरविलें कीं, इंग्लंड देशांतील सर्वसत्ताक राज्याचें प्रभुत्व क्रास्वेल यानें करावें. त्याने