पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५३ अशी गोष्ट करणें आज मला अवश्य प्राप्त झाली आहे." असें संतापानें बोलून तो तीनशें शिपाई वराबर घेऊन मो- ट्या त्वरेनें पार्लमेंट सभेस गेला. आपण आंत गेल्यावर त्याने पाय आपटून खूण केली; ती ऐकतांच त्या साया वाड्यांत येऊन त्याचे हत्यारबंद लोक शिरले. मग तो सभासदांकडे पाहून बोलतो, “तुह्मास धिक्कार असो, निघा येथून, तुमच्यापेक्षां भले माणूस या सभेत बसूं द्या, जे आ पलें काम तुमच्यापेक्षां फार चांगले रीतीने करतील. तुह्मी आतां पार्लमेंट नव्हा. मी खरेंच तुझास सांगतों. तुह्मी आतां पार्लमेंट नव्हा. ईश्वरास तुमचें कारण नाहीं." तेथें सर हारीवेन ह्मणून गृहस्थ होता, तो काम्वेल याचे अशे उन्मत्त भाषणावर कांहीं बोलूं लागला, त्यास काम्वेल मोठ्यानें ह्मणाला, " सर हारी, अरे सर हारीवेन, ईश्वरानें मला हा सर हारीवेन याचे हातून सोडवावें." मग एकाचें वस्त्र धरून तो ह्मणतो, तूं रंडीबाज आहेस; दुसऱ्यास बो लला. तूं व्यभिचारी आहेस; तिसऱ्यास ह्मणाला, तूं दारू- बाज; चवथ्यास ह्मणाला, तूं अधाशी.” सर्वांस ह्मणतो; "तुझीच मला असें करणें अवश्य प्राप्त केलें, मला असे करण्यापेक्षां मृत्यु आला तरी बरा, ह्मणून मी रात्रंदिवस ईश्वराचा शोध करीत आहे." मग त्यानें मेजावरील सोटा काढावयास हुकूम केला. नंतर सर्व सभासदांस बाहेर घालवून, आणि तो वाडा साफ करवून, त्यानें दारांस कुलुपें घातली; आणि आपले खिशांत किली टाकून निघून गेला. पुढले पार्लमेंट सभेस जे त्यानें पुरुष योजिले, ते सर्व अतिनीच, हलके, मूर्ख आणि स्वच्छंदी असे होते.