पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२ केला. ती ही कीं, सैन्यांतील सरदारांस समजावून त्यांचे हातून कामन्स यांस एक अर्जी द्यावी, ती दिली असतां का मन्स तिचा तिरस्कार करून मानणार नाहींत, आणि तसे झाले असतां आपलें काम होईल, असे तो पूर्वीच जा- णून • होता. पुढे त्या फौजेंतील सरदारांनीं ती अर्जी दिली; तीत मजकूर असा की, आमची बाकी सरकारावर आहे ती द्यावी, आह्मावर जुलूम चालले आहेत, त्यांची चौकशी करावी; आणि तुमच्या सभेची नेमणूक होऊन किती दिवस झाले, आणि पूर्वी प्रजेच्या स्वतंत्रपणाची वृद्धि करण्याविषयीं, आणि पार्लमेंट सभेची रीति बदलण्याविषयीं तुझी काय काय प्रतिज्ञा केल्या होत्या, या गोष्टीचा विचार करावा. स०३० १६५३ फौजेमुळे आपले हाती सत्ता आहे, हे पार्लमेंट सभेने त्या वेळेस ध्यानांत न आणितां फौजेचे धट्टाईमुळे आग्रहास पडून एक मंडळी नेमिली; आणि तीतील गृहस्थांस सांगि तले की, पुढे अशी अर्जी जो कोणी देईल तो सरकारचा गुन्हेगार, असा एक हुकूम तयार करावा. यावर फौजेनें कडक उत्तर दिलें. आणि पार्लमेंट यानेंही त्यासारि- खेंच प्रत्युत्तर दिलें. पुढे प्रतिक्षणी त्या दोघांमध्ये तंटा वाढत चालला. असें होईल हें काम्वेल यानें बहुत दिवस अगोदर जाणिलें होतें; आणि तो तसे व्हावें ह्मणून इच्छा. ही करीत होता. मग तो एके दिवशीं आपले लोकांशीं मसलत करीत होता; इतक्यांत त्या वेळेस पार्लमेंट सभेत काय विचार होत आहे, ही त्यास बातमी समजतांच, तो मोठ्या आवेशानें उठला; आणि जवळ मंजर वर्नन ह्मणून होता त्यास ह्मणाला; 'माझ्या डोक्याचे केंश उभे रहावे, 66