पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केला. या कारणामुळे पार्लमेंट सभेनें त्या राज्याशी लढाई करावी अशी प्रतिज्ञा केली. इंग्लिश लोकांचा मुख्य नौ- काध्यक्ष ब्लेक याच्या पराक्रमावर आणि शूरपणावर पाल- मेंट सभेचा भरंवसा होता; कारण त्या गृहस्थानें मोठेपणीं त्या कामाचा अभ्यास केला असतांही तो पूर्वीच्या सर्व सर- दारांपेक्षां विशेष शूर आणि शहाणा असा दिसून आला होता. तिकडे डच लोकांनी जो आपला वानत्रप ह्मणून मोठा नौकाध्यक्ष तो युद्धास तयार केला होता. या दोघे प्रतापी नौकाध्यक्षांच्या अनेक लढाया झाल्या, आणि बहुत वेळ दोघेही विजय पावले. त्या भयंकर युद्धापासून त्या दोघेही नौकाध्यक्षांचा पराक्रम मात्र प्रगट होई, परंतु उत्कृष्ट कोण हैं ठरेना. पुढे व्यापार बुडूं लागला, ही गोष्ट डच लोकांस वाईट वाटून त्यांनी तहाचे बोलणे लाविलें; परंतु पार्लमेंट सभेस काम्वेल सरदाराचे जमिनीवरील फौजेपासून फार भय होते, ह्मणून ती निर्बळ करावयाक रितां जंवपर्यंत आरमार ठेववेल तोपर्यंत ठेवून, तिकडे रा ज्याचें सामर्थ्य खर्चून तह करूं नये, युद्धच करावें, असा त्यांनी निश्चय केला होता. तात. हा त्यांचा वेत काम्वेल सरदारास लागलाच कळला, आणि समजले की, हे सभासद लोक माझी सत्ता अधिक वाढत आहे, तिचें भय मानून ती कमी व्हावी असे इच्छि- त्याचा स्वभाव मुळापासून धीट होता; आणि त्या- च्या जें जें मनांत येई तें तो निर्धास्तपणे करीत असे. तशांत त्यानें निश्चय केला कीं, पुढे आपण परस्वाधीनपणांत राहूं नये. सैन्यास त्याचा पक्ष होता; ह्मणून निर्भयपणानें त्यानें दुसरी एक मोठी धीराची गोष्ट करावयाचा निश्चय