पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

याचे मदतीनें राज्यांत सर्वत्र चालू करूं लागले. अयर्टन, आणि लड्लौ, या दोघांनी सर्व अयर्लंड आपले ताबेखाली आणिलें. अमेरिका खंडांत ज्या संस्थानांनी राजाचा पक्ष धरिला होता, त्या सर्वांस आपले हाताखाली आणिलें, आणि जर्सी, सिली आणि ऐल आफमान इत्यादि बेटेही सहज आपले हाताखाली आणिलीं. साठ सत्तर केवळ हलके आणि अविद्वान् सभासद मिळून पार्लमेंट एक मोठे राज्याचा कारभार चालवितात, असे पाहून सर्व लोकांस परम आश्चर्य वाटलें. त्यांनी आपले हाताखालचे लोकांचा कांहींच बंदोबस्त राखिला नव्हता; एक राजमंत्री या नां- वानें अठतीस गृहस्थ होते, त्यांस सर्व लोकांनी कागदपत्रे लिहावी असें होतें. पुढे त्यांनी फौजा ठेविल्या; गलबतें जमविली, आणि युरोप खंडांतील जवळचे राज्यांस नियम करून दिले. राज्याचा वसूल मोठ्या बंदोबस्तानें खर्च करीत ह्मणून सरकारास लुटून लोक मातबर होईनात असें झाले. सरकारचा वसूल धर्माध्यक्षांच्या जमिनी आणि दरमहा एकशें वीस हजार पौंड कर, हा सर्व पैका मिळून त्यांनी राज्य चालविलें. या रीतीनें आपले घरचें राज्य ताबेखाली आणून, पुढे ज्या डच लोकांनी फारसा अपराध केला नव्हता, त्यांचें शासन करावयाचा निश्चय केला. पार्लमेंट सभेने पूर्वीच राजाचा एक न्यायाधीश होता, त्यास आपला वकील करून हालंड देशांत पाठविला; त्यास जेथें राजपक्षांचे कोणी लोक होते त्यांनी ठार मारिलें. पुढे कांहीं दिवशीं पार्ल- मेंट सभेनें सेंटजान ह्मणून त्या दरवारांत वकील पाठविला, त्याचा प्रिन्स आफआरेंज याचे मित्रानीं कांहीं अपमान