पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४९ स्काट्लंड देशांतून जलद आपल्यावर येत आहे. ही बा- तमी कळून राजपुत्राचे मनांत नुकतें भय उत्पन्न होत आहे, इतक्यांत तो पराक्रमी सरदार स्वतः येऊन शहरा- वर पडला; आणि त्याने राजपक्ष्यांचा अतिशय नाश केला. रस्त्यावर प्रेतांचे ढीग पडले; सर्व स्काच लोक धरले गेले, आणि कितीएक मेले; राजपुत्र मात्र बहुत पराक्रम करून शेवटीं पळून गेला. नंतर राजपुत्र फार संकट भोगून, आणि नानाप्रकारचे वेष धरून, एकेचाळीस दिवसांनी नामँडी देशांत फिस- शांप शहरी जाऊन पोहोंचला; तथापि त्याचें पळून जाणे चाळीस माणसांस कळले. पुढे विजयीं होऊन काम्वेल उत्साहाने लंडन शहरास आला. तेथें पार्लमेंट सतला मुख्य, लंडन याचा मेयर, आणि माजिस्ट, हे सर्व त्याचे भेटीस गेले. असें हिताचें चिन्ह पाहून त्यानें विचार केला कीं, स्काच लोकांनी आ पणास त्रास दिला आहे, तर त्यांचा प्रथम सूड उगवावा. ह्मणून मग पार्लमेंट सभेचे हातून हुकूम करविला कीं, स्काटलंड हें जिंकून घेतलेले एखादे परगण्यासारिखें इंग्लिश सरकारचे ताबेखाली यावें; परंतु त्या देशांतून कांहीं सभासद पार्लमेंट सभेस यावे, इतकी सत्ता त्याजवळ ठेविली. पुढे त्या देशांत न्याय करावयाकरितां न्यायाधीश नेमिले, आणि काम्वेल यानें आपले पाठीमागे स्काच लोक केवळ स्वाधीन व्हावयाकरितां जो जनरल मंक ह्मणून सरदार ठेविला होता, त्याने फार चातुर्यानें वर्तणूक केली, त्यामुळे ते शांत झाले. या रीतीनें इंग्लिश पार्लमेंट आपली सत्ता काम्वेल