पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ ह्मणून तर पार्लमेंट सभेनें त्याचा सत्कार केला. त्या वेळेस स्काच लोकांनीं राजाचा पक्ष धरून चार्लस राजाच्या मुलग्यास राजपदावर बसविलें होतें; ह्मणून पार्लमेंट त्याशी लढाव- यासाठी एक सरदार योजीत होतें. फेर्फाक्स ह्मणून जो पूर्वी सांगितला, तो तें काम पतकरीना; कारण मुळापासून तो प्रेस्बिटीरियन लोकांचे नाशास झटत नसे. तें काम काम्वेल यास सांगितलें. मग तो सोळा हजार फौज घेऊन मोठ्या धीरानें स्काट्लंड देशास गेला. वास्तविक पहातां स्काच लोकांनी चार्लस यास राज्य- पदावर ठेविले नव्हते, तर कैदेत जसे ठेवावें तसेंच त्यास राखिलें होतें. मग ते क्रावेल सरदाराशीं युद्ध करावयास सिद्ध झाले. त्या दोघांची लढाई झाली, तीत इंग्लिश लोकांचे दुप्पट स्काच लोक असतांही त्यांस पळवून काम्वेल नाश करीत त्यांचे पाठीस लागला. साऱ्या लढाईत त्याचे चाळीसही लोक पडले नाहीत. इ०स० १६५० अशा संकट समयीं राज्यासाठी सर्व खर्च करावें, असा विचार करून राजपुत्र चार्लस यानें योग्य मसलत केली. ती ही कीं, लागलेंच जवळ आहे तितकें सैन्य घेऊन इंग्लंड यांत जावें. कारण कीं, तेथें राजपक्षाचे सर्व लोक येऊन आपल्यास मिळतील असे त्याचे मनांत होते; परंतु आपली फौज पुढे न जमेल, याविषयी त्याची लवकरच निराशा झाली, कारण त्यानें जो उद्योग आरंभिला होता, तो भयंकर जाणून त्याजवळचे लोक दिवसानुदिवस कमी होत चालले, आणि क्राग्वेल याचे नांवानेंच भिऊन इंग्लिशही कोणी त्याजवळ येईनात. असा तो वोर्सेस्तर यांत आल्यावर त्यास समजले की, काम्वेल चाळीस हजार फौज घेऊन