पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कितीएक त्याच्या शत्रूंस प्रतिबंध केला नाही ह्मणून आ- पली अतिशय निर्भर्त्सना करिते झाले. • चार्लस राजाचा शिरच्छेद झाला तेव्हां त्याचे वयास एकुणपन्नासावें वर्ष होतें; आणि त्यानें चोवीस वर्षे इ०स० राज्य केले. त्याचें शरीर बळकट, यथायुक्त, १९४८ आणि उंचीनें मध्यम होतें, त्याचें मुख रमणीय होतें ब्यानुआरी परंतु नेहमी चिंताग्रस्त आणि ग्लान दिसें; याचे कारण असें कीं, नेहमी दुःखें अनुभविल्यामुळे ते तसे झाले होतें. त्याचे गुण सांगण्याचे प्रयोजन नाहीं, कारण त्याचे कर्मा- वरून ते चांगले कळतील. प्रकरण २९. सर्वसत्ताक राज्य. संन् १६४८ पासून संन् १६६० पर्यंत. काम्वेल यानें चार्ल्स राजाचे मरणाविषयीं गुप्तपणे उद्योग केला होता, त्याचे मनांत तो मेल्यानंतर मोठेमोठ्या 'इच्छा उत्पन्न होऊ लागल्या. नंतर अयर्लंड एथील फौ- जेचा सरदारपणा व्यास प्राप्त झाला; तेव्हां ड्युक आमंड याचे हाताखालचें राजपक्षी सैन्य, आणि ओनियल याचे हाताखालचें ऐरिश लोक यांशीं लढायाचा प्रसंग त्यांस आला. परंतु त्या वेवंद सैन्याच्यानें क्राम्बेल यापुढे काही करवलें नाहीं. ह्मणून त्यानें लागलाच सर्व मुलूख घेतला. पुढे सर्व शहरें स्वयें त्याचे स्वाधीन झाली. यानें तील माणसे क्रूरपणाने ठार मारिली. असा विजय मिळवून तो परत इंग्लंड देशांत आल्यानं