पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६ करावे, अशी ईश्वराची प्रार्थना करितों, आणि प्राटेस्तंट धर्म ज्याप्रमाणे इंग्लंड एथील देवळांत चालतो, त्यावर मा- झी भक्ति आहे. याप्रमाणें अंतकाळीं तो जे कांहीं शब्द बोलला, ते श्रोत्यांच्या मनांत असे भरले कीं, त्याच्या रख- वालीस जो कर्नल टाम्लिन्सन ठेविला होता, त्याने आपण मत घेतलें असें कबूल केलें. तो राजा चार्लस मृत्यूची तयारी करीत असतां विशप जक्सन यास बोलला, “अहो तुमच्या जन्मांत एक दशा आझून बाकी राहिली आहे, ती दुःखदायक तर खरीच, परंतु स्वल्प आहे. ती तुह्मांस लांब पोहोचवील. ती तुह्मास पृथ्वीवरून काढून स्वर्गात नेईल; आणि तेथें तुह्मास सुशो- भित गुट मिळेल." राजानें उत्तर केलें कीं, "मी या राज्यांतून अक्षय राज्यास जातों, जेथें दुःखास स्थळ मिळत बिशप बोलला, "तुझी नश्वर राज्य देऊन अन- श्वर घेत अहां, आहाहा फार चांगला व्यापार !" मग चा- ल्र्स आपल्या अंगावरचे मोठे वस्त्र काढून आपले भूषण विशप यास देऊन बोलला "स्मरा." मग त्यानें आपलें नाहीं." A डोके लांकडावर धरिलें, आणि हात वर करून खूण केली. तेव्हां एके शिरच्छेद करणारानें एक वार करून त्याचें डोकें पाडिलें, तें वर उचलून दुसरा बोलला, "हे राज्या पराध्याचे डोकें." हे पाहून लोक पहात होते, त्यांस फार दुःख झाले; गळे भरून आले, नेत्रांतून आश्रुपात होऊं लागले, आणि कितीएकांनी मोठ्यानें आक्रोशही केला. पुढे त्यास धर्म, आणि दया माया यांचे स्मरण होत चाललें, आणि कितीएक राजास आपण दुःख ह्मणून, आणि