पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इंग्लंड देशाची बखर. प्रकरण २७. प्रथम जेम्स राजाची कथा. संन् १६०२ पासून १६२५ पर्यंत. स्काट्लंड याचा साहावा, आणि इंग्लंड याचा पहिला जेम्स या नांवाचा राजा सिंहासनारूढ झाला, त्या वेळेस राज्यांत सर्व लोकांस परम आल्हाद झाला; कारण, त्यास मुळचा राज्याचा अधिकार होता; इलिझाबेथ राणीनें, त्यानें राज्य करावें, असें आपले मृत्युपत्रांत लिहून ठेविलें होतें; आणि त्याविषयी पार्लमेंट याचीही संमति होती. इतकी अनुकूळता असतांही प्रारंभींच त्याचा घात कराव- याकरितां बंड उत्पन्न झाले; त्याचा उपक्रम करणारे मुख्य, लार्ड ग्रे, लार्ड काभम, आणि सर वाल्टर राली, या नां- वांचे तिघे पुरुष होते. पुढे तें बंड फुटलें, आणि त्या स- वींस धरून ठार मारावें असे ठरविले; परंतु राजाच्या मनांत दया येऊन त्यानें तें शासन केले नाही. काभम आणि ग्रे, या दोघांनी आपलीं डोकीं देखील लांकडावर ठेविली होतीं, परंतु त्यांस सोडिलें. राली याचाही शिरच्छेद करूं नये असें केलें, परंतु त्यास कैदेत ठेविलें. तो तसाच बहुत वर्षेपर्यंत होता; आणि त्यावर अन्याय कधीं शाबूत झाला नाहीं तरी, शेवटीं तो त्यामुळेच मारला गेला. 1 जेम्स राजा राज्यकारभारांत अतिसुशील, आणि स हिष्णु होता, ह्मणून पोप याचे मत पुनः स्थापायाची लो- कं. म. न. प. चा. पोतदार