पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करितां तुह्मी माझा पोषाक चांगला करा. व्हाइहाल याचे पुढले गलींत त्यास मारावयाचे ठिकाण नेमलें होतें, याचे कारण कीं, शासन कठिण व्हावें. त्या ठिकाणी एक भोजन शाळेजवळ मरणाची जागा नेमिली होती, तेथें रा- जाचा सेवक आणि मित्र जो बिशप जक्सन तो त्यास घेऊन गेला; जो बिशप आपले धन्यासारिखाच गुणी आणि पुण्यवान् होता. त्या मरणस्थळावर काळे वस्त्र घातलें होतें, आणि कर्नल टाम्लिन्सन् याजवळ एक पलटन देऊन तेथें रखवालीस ठेविला होता. त्या स्थळा- वर एक लांकूड, कुन्हाड, आणि तोंडावर पडदे घेऊन शिरच्छेद करणारे लोक होते. पुढें जें भयंकर वर्तमान होणार त्याची वाट पहात लोक दूर उभे राहिले होते. या सर्व सिद्धतेकडे राजानें परम स्थिर मनानें पाहिलें; आ- णि पुढे सर्व लोकांनी ऐकावयाजोगे कांहीं बोलावे असें त्याचे मनांत आले; परंतु ते होते "ह्मणून त्यानें जवळ जे थोडे लोक होते त्यांशीं बोलावयाचा प्रारंभ केला. तो बोलला कीं, लढाई झाली यांत मजकडे कांहीं अन्याय नव्हता; कारण पार्लमेंट यानें मार्ग दाखविल्यावर मी यु- द्धाची सिद्धता केली. बरें, ती जरी केली तरी माझे मनांत इतकेंच होतें कीं, पूर्वजांनी जी आपल्यापाशीं सत्ता दिली, तिचें संरक्षण करावें. असो, आतां माझा शिरच्छेद होतो आहे, ईश्वरानें निःपक्षपात केले, अशी मला खातरी आहे; मी कबूल करितों कीं, अर्ल स्त्राफर्ड याच्या निरर्थ शास- नाविषयीं मी संमति दिली ह्मणून ईश्वराने मला शिक्षा केली. मी सर्व माझे शत्रूस क्षमा करितों; प्रजांनीं पुनः पूर्ववत् आज्ञेत वागावें, आणि माझे मुलानें माझे मागें राज्य