पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४४ जाविषयों ईश्वरापाशीं आशीर्वाद मागितला. तें एके सर- दारानें ऐकतांच त्या गरीब शिपायास एके सपाट्याबरोबर जमिनीवर ठार पाडिलें; ते पाहून राजाने ह्मटलें कीं, अप- राधापेक्षां शासन फार मोठे झालें. त्यानें व्हाइटहाल वाड्यांत आल्यावर विनंती केली कीं, माझे मुलांची माझी भेट व्हावी; आणि लंडन एथील पूर्वीचा बिशप डाक्तर जक्सन यानें माझे भजनाचे वेळेस जवळ असावें. ही प्रार्थना त्याची ऐकिली, आणि त्यास शिरच्छेदाची तयारी करावयास तीन दिवसांचा अवधि दिला. त्याचे कुटुंबांतून त्या वेळेस इंग्लंड यांत राज- कुमारी इलिझाबेथ आणि ड्युक ग्लास्तर तो तीन वर्षां- चा मुलगा, अशीं दोघे मात्र होतीं तीं दोघे जवळ आल्यानंतर त्यानें आपले मुलीस हितावह आणि उपयोगी असा उपदेश केला, आणि आपले मुलास आलिंगून बो- लला, "मुला, तुझ्या बापाचा शिरच्छेद होणार आहे, खरेंच माझे डोके जाणार आहे; परंतु मी सांगतों, हे ध्यानांत धर कीं, तुझे भाऊ चार्ल्स आणि जेम्स जोपर्यंत जीवंत आहेत तोपर्यंत तूं राजपद स्वीकारूं नको, संधी आली ह्मणजे ते त्या दोघांची डोकी कापतील." मूलडोळ्यांत आंसवें काढून बोलला, "पहिल्याने मी मरेन.” राजास शासन ठरलें तेव्हांपासून शिरच्छेद होईपर्यंत जरी शिरच्छेदकाष्ठ तयार करण्याविषयी कामकऱ्यांची गडबड चालली होती, तरी त्यास नेहमी पहिले सारिखीच गाढ झोंप लागे. शेवटी शिरच्छेद व्हावयाचा त्या दिवशीं त्याने मोठे सकाळी उठून आपले एके सेवकास हाक मारिली, आणि सांगितलें कीं, आज मोठा उत्साहाचा दिवस आहे, या