पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४३ सत्ता प्रतिपादन करावयाकरितां ब्राड्शा ह्मणूं लागला कीं, सर्व सत्तेचें मूळ प्रजा; त्यांपासून आह्मास मुख्यारी प्राप्त झाली आहे. तो राजास बोले की, इंग्लंड याचे कामन्स यांनी जे कोर्ट स्थापिलें आहे त्याचे सत्तेविषयी तुह्मी शंका आणूं नये. यावर राजा उत्तर देत होता, परंतु तो त्यास बोलू देईना, मध्ये मध्ये विश्न करी. या रीतीनें कोर्ट या पुढे राजास तीन वेळ आणिलें, आणि तीन वेळ त्यानें त्यास अख्त्यार नाहीं असेच ह्मटले. शेवटीं चवथे वेळेस तें स्वतःसिद्ध कोर्ट यापुढे त्यास नेत असतां वाटेनें लोक व शिपाई हे ओरडले, "इनसाफ ! इनसाफ !” शिरच्छेद ! शिरच्छेद !” इतके झाले तरी राजा घाबरला नाहीं. मग न्यायाधीशांनी कांहीं साक्षी घेऊन ठरविलें कीं, पार्लमेंट यानें ठेवलेले फौजेबरोबर युद्ध करावयास राजा तयार झाला ह्मणून तो अपराधी; याकरितां त्याचा शिरच्छेद करावा. अशा संकट समयींही राजा मोठे थोर, उदार आणि चांगले रीतीनें वर्तला. तो कोर्ट यांतून परत जात असतां शिपाई आणि दुसरे लोक पुनः एकदां बोलले, “इनसाफ आणि शिरच्छेद.” ते त्यास दुसऱ्या फारच वाईट गोष्टी बोलले, त्यांनी त्याची फजीती आरंभिली, आणि त्यांतून एक राजाच्या तोंडावर थुंकला. राजानें स्वस्थपणें तो दांडगाई सोसून ह्मटलें, “ गरीब विचारे, ते दोन पैशां- साठी आपले सरदारांसही अर्सेच करितील." लोकांमध्यें ज्यांनी केवळ मनुष्यपणा सोडिला नव्हता, त्यांचा त्या वेळेत शोकानें गळा भरून आला; आणि नेत्रांतून अश्रु- पात येऊं लागले. एका शिपायास दया येऊन त्यानें रा- ५