पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ वर वसविला. चार्ल्स फार दिवस कैदेत होता, आणि आतां अपराधी ह्मणून चौकशी करितां आणिला होता, तथापि त्यानें राजाचा मान सोडिला नाही. त्याने एक वेळेस सर्व सभासदांकडे तिरस्काराने पाहिले, आणि टोपी न हालवितां तसाच बसला. बाकीच्या सर्वांनींही टोपी का- ढली नाहीं. मग वकिलाने त्याचें अपराध पत्र वाचलें. तें असे की, लढाईच्या प्रारंभापासून जे रक्त पडले, त्याचें कारण राजा. ही गोष्ट आली तेव्हां राजास तिरस्कार ये- ऊन हंसे आवरेना. तें वाचून झाल्यावर ब्राड्शा राजाशीं बोलूं लागला, आणि त्याने सांगितलें कीं, आपण उत्तर काय करितां, याची कोर्ट वाट पहात आहे. राजानें सौम्यपणाने उत्तर द्यावयास प्रारंभ केला. तो ह्मणाला की, कोर्ट यास माझी चौकशी करण्याचा अख् त्यार नाही; मी पार्लमेंट सभेशीं तह केला, त्याचे कल माप्रमाणे यथास्थित चाललो असतां माझी ही दशा होऊं नये. वास्तविक न्यायाधीशीची सत्ता येण्यास लार्ड सभेचें अंग पाहिजे, तें एथें कांही मला दिसत नाहीं. मी राजा आहे आणि कायद्यांचा मूळ आहे, ह्मणून ज्या कायद्यांस माझी संमति नाहीं, त्यांवरून माझी चौकशी होऊं नये. लोकांची स्वतंत्रता राखण्याचें माझें काम आहे; ह्मणून मी अशे अपहारकांचे सत्तेस संमति दिली तर मला बट्टा ला- गेल. वास्तविक कोर्टापुढे मी माझे वर्तणुकीचा जाब- साल देईन; परंतु तुमच्या पुढे मी तें बोलणार नाहीं, या विषयीं मला क्षमा असावी. मी असे केले तर लोक ह्मण- तील कीं, मी राजनीति मोडली. असें ह्मणतील, आणि तीसाठी प्राण दिला असें ह्मणणार नाहीत. कोर्ट याची