पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४१ मान न ठेवितां चाकरी करावी. ड्यूक हामिल्टन याचें पारिपत्य राजासारिखेंच करावयाचा बेत होता. त्यास विंड् सर स्थानाजवळ राजाची भेट घ्यावयाची आज्ञा मिळाली. मग तो जाऊन राजाच्या पायां पडला आणि बोलला, "हे माझे मित्रा स्वामी," हें ऐकून राजाच्या गालावरून अश्रु- पात वाहूं लागले. आणि तो विचारा त्यास वर उठवून आणि प्रीतीनें आलिंगून बोलला, “तुह्मास मी मित्रस्वामी होतों खरा." शत्रूपासून त्यानें बहुत दुःखे भोगिलीं, परंतु त्याची अशी खातरी होईना कीं, ते आपली उघड चौकशी करि- तील. त्यास असे वाटले होतें कीं, ते चोरून कोणत्या तरी उपायानें आपला प्राण घेतील. पुढें जी असाधारण चौकशी व्हावयाची तिची तयारी करण्यांत ज्यान्युआरी महिन्याचे सहावे तारिखेपासून वि सावे तारिखेपर्यंत दिवस गेले. कामन्स यांनी त्या चौकशी करितां एकशे तेहतीस न्यायाधीश नेमिले, परंतु कधीही यांतून सत्तरांवर एके ठिकाणी जमले नाहींत. बहुतकरून त्यात फौजेचे मुख्य सरदार, कामन्स यांतील कितीएक, आणि कितीएक लंडन शहरचे लोक इतके नेमिले. यांतून पुष्कळ हलके कुळांतले होते. ब्राड्शा ह्मणून एक वकील होता त्यास मुख्य नेमिलें, कोक ह्मणून एक गृहस्थ होता, त्यास इंग्लिश लोकांकडचा बोलणारा केला, डारिस्लास, स्टील आणि आस्क यांस मदतनीस केलें. तें कोर्ट वेस्त- मिन्स्तरहाल वाड्यांत बसले, आणि काम सुरू झाले. मग विड्सर या ठिकाणांतून राजास सेंट जेम्स एथे आणून दुसरे दिवशीं चौकशी करितां मोठें कोर्ट यांत नेला. तो पुढे आला तेव्हां एके चोपदाराने त्यास खुर्ची