पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साठ सभासद दूर केले; आणि सुमारे साठ इंडिपेंडेंट लोकांशिवाय दुसऱ्यांस आंत जाऊं दिलें नाहीं. या कृत्यास प्रैड याचें शोधन असे नांव पडलें; आणि बाकी जे वळत्काराने राहिले होते, त्यांस रंप असे नांव झाले. यांनीं मग लवकरच निश्चय ठरविला कीं, कांहीं दिवसांपूर्वी सभेत जें कृत्य झाले तें गैरवाजवी, आणि फौ जेच्या सरदारानें केलें तें योग्य. पुढे राजावर अपराध ठर चावयाकरितां एक कमिटी नेमिली, आणि निश्चय ठरवि- ला कीं, राजानें पार्लमेंट सभेशीं लढाई केली; ह्मणून तो सरकार गुन्हेगार ठरला. या कल्पिलेले गुन्हेगारीची 'चौकशी करावयाकरितां एक न्यायाचे मोठें कोर्ट नेमिलें. एक खाटक्याचा मुलगा कर्नल हारिसन ह्मणून होता, त्यास हुकूम केला की, राजास हस्त्वयास्तल यांतून विसर ठिकाणी आणून तेथून लंडन शहरास घेऊन यावें. सर्व लोक प्रीतीनें राजाचे दर्शनास गेले, तेव्हां त्याचा चेहरा व शरीर उतरलें पाहून त्यांस फार क्लेश वाटले. त्यानें आपली दाढी वाढविली होती, त्याचे केंस चिंतेमुळे फार पांढरे झाले होते, आणि वस्त्रांवरून विपत्ति आणि कृशता यांची लक्षणे दिसत होती. असा तो चार्ल्स विपत्तीमध्यें- ही राजाचें स्वरूप धारण करून होता; जे पाहून त्याचे शत्रूच्या मनांतही प्रीति आणि दया उत्पन्न व्हावी. त्याचे जवळ फार दिवसपर्यंत एक ह्मातारा सेवक असे, त्याचें नांव सर फिलिप वार्विक; तो मात्र आपले धन्याचा दैवयोग पाहून फार कष्टी होई; परंतु त्याचे हातीं कांहीं नव्हते. पुढे बाहेरचीं जीं राजाची चिन्हें तींही त्याचीं नाहीं अशीं केलीं, आणि नवे चाकरांस हुकूम केला कीं, कांहीं त्याचा ४०२०७