पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३९ आणि गांवकुसूं मोडलें, किला फेर्फाक्स याचे स्वाधीन केला. आणि पार्लमेंट सभेच्या आज्ञा त्यानें मोडल्या हें पसंत केलें. फौजेनें राजास हांतनकोर्ट नांवाचे वाड्यामध्ये कैदेत ठेविला होता, तेथून त्यानें पळून जावयाची युक्ति केली, ह्मणून त्यास ऐल आफवैट बेटांत क्यारिसब्रूक क्या- स्तल यांत बंदीस ठेविला. इतकें झालें असतांही राज्या- ची विपत्ति बंद करावी ह्मणून तो आणि पार्लमेंट यांमध्ये करार होऊं लागले; ह्मणून पार्लमेंट सभेनें अशी मसलत केली कीं, राजाचे सत्तेनें फौजेचा दंगा बंद करावा. तो वंदिवान राजा आणि कामन्स या दोघांमध्ये पुनः पुनः तहाचें बोलणे झाले, परंतु त्यापासून कांही उपयोग झाला नाहीं; कारण त्या वंडानें आपलें बळ जाणून राजाचा सूड घ्यावा, अशी खचित् मसलत केली. अशा दृढ निश्चयानें तो फ़ौज विंड्सर या ठिकाणी गेली; आणि तिणें एक काम- गाराचे हातून राजास धरवून ऐल आफवैट बेटाचे स- मोर हतक्यास्तल या ठिकाणी नेऊन कैदेत ठेविलें. कामन्स यामध्ये जरी आपला मतलब सिद्धीस न्यावयाची शक्ति राहिली नव्हती, तरी सर्व फौजेच्या देखत आपण राजाशीं तह ठरवावयाचा ते उद्योग करूं लागले, परंतु त्याचेच दुसरे दिवशीं कर्नल प्रैड ह्मणून सरदार होता, त्याने दोन पलटणी घेऊन जाऊन त्या सभेस वेढा दिला, आणि प्रेस्वितीरियन पक्षाचे एकेचाळीस सभासदांस धरून त्याच घराची एक खोली होती, जिचें नांव नरक असे पडलें होतें, तीत पाठवून दिले. दुसरे सुमारें एक शें