पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ काम्वेल आला तेव्हां त्याचा मोठा सत्कार करून फौजेनें आपला मुख्य सरदारपणा त्यास दिला. त्या समयीं कामन्स सभेत दोन मतें पडली. एक फौजेस प्रतिबंध करूं नये असे, आणि दुसरें त्याचे विरुद्ध. प्रथमचे मताविषयी बहुतांची संमति होती. आणि दोन मुख्यांसही तें मान्य होतें. असा मतांचां भेद पडतांच उभयपक्षी अभिमान पडून दोन फळ्या झाल्या; आणि त्यांतील वासष्ट कामन्स व दोन मुख्य इतकें निघून फौजे- जवळ गेले, फौजेस मोठा आनंद झाला, आणि ती सुमारें वीस हजार भयंकर फौज एकमत करून त्यांस पूर्वीचीं पदें द्यावयास निघाली. इकडे जे कामन्स मागे राहिले होते, त्यांनी निश्चय केला कीं, आतां काय होईल तें होऊं, फौजेचा दंगा चालू द्यावयाचा नाहीं. यांनी मुख्य नवे स्थापिले, शिपाई ठेव- ण्याचा हुकूम केला, आणि दंगा बंद करावयाचा निश्चय सारे शहराने केला; परंतु जंवपर्यंत शत्रू दूर होते, तंवप- र्यंत हा निश्चय चालला, आणि काम्वेल याची भयंकर फौज येतांच सर्व जिकडे तिकडे भ्याले, आणि त्यांचे पक्षास मिळावयास कबूल झाले; तो सरदार येतांच गां- वचे दरवाजे उघडले; मग त्यानें त्या दोन मुख्यांस आणि सर्व सभासदांस निर्भयपणे आपापले घरीं ने. ऊन पोहोचविलें, अकरा सभासदांनी हा दंगा मूळ उत्पन्न केला, असे ठरवून त्यांस काढून टाकिलें. त्यांतून बहुधा परदेशास निघून गेले. मेयर, शेरिफ, आणि तीन आल्डमैन यांस किल्ल्यावर पाठविले, कितीएक शहरचे लोकांस आणि फौजेकडचे कामगारांस कैदेत ठेविलें,