पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, विलियम लार्ड यास बंदीत ठेविलें होतें, त्याची आतां चौ- कशी करून शासन ठरविलें; आणि त्याचा शिरच्छेद केला. तो मेला त्याच दिवशीं लिटर्जी सरकारी ढुकुमा- वरून रद्द केलें, आणि इंग्लंड एथील धर्म प्युरिटन संस्थाना- सारिखा केला. अशी चांगली उलटापालट झाली ह्मणून इंग्लिश आणि स्काच यांनी उघड आनंद दाखविला. चार्ल्स राजाचे दैवाचा निश्चय ज्या लढाईनें इ०स० झाला, ती नर्थप्टन प्रांतांत नेस्वी ह्मणून गांव १६४५ आहे तेथें झाली. प्रारंभी राजाचे फौजेचा जय होईल असे दिसलें, परंतु शेवटीं क्राम्वेल यानें येऊन त्या- चा अगदीं पराजय केला. लढाई केवळ हा- तांतून गेली पाहून राजा पळून गेला. मग शत्रूंनी त्याचें बुणगें, आणि तोफा घेतल्या त्या वेळीं सुमारें पांच हजार बंदिवान धरिले गेले. जन या रीतीनें • नेस्बी एथील लढाईपासून ब्रिस्तल, ब्रिज्वाटर, चेस्तर, शार्बोन, आणि बाथ इत्यादि मुख्यमुख्य शहरें पा- लमेंट सभेचे हाती आली. एक्सीटर शहरास वेढा घा- तला; तेव्हां पश्चिम तालुक्यांतील राजाची फौज जिकडे तिकडे होती, ह्मणून फेर्फाक्स् यानें फार निकडीचा हला केला, तेव्हां तें शहर आपाप स्वाधीन झाले. असा चहूं- कडून कोंडल्यामुळे राजा निरुपाय होऊन आक्स्फर्ड शहरांत गेला, आणि पुनः तहाचे उद्योगास लागला. त्या समयीं फेफक्स् विजय पावून मोठी बळकट फौज बरोबर घेऊन आक्सफर्ड शहरावर हल्ला करावयाच्या वे तांत होता; आणि तें शहरही त्यास साध्य व्हावयास उशीर न लागावा असें होतें. दुष्ट प्रजांनी आपल्यास