पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ एकदा 66 फार परगण्यांनीं दोहोंतून एक पक्ष धरिला. कितीएक परगणे तह व्हावा ह्मणून वारंवार अर्ज्या करीत. असा चमत्कार झाला कीं, लंडन एथील सुमारे दोन तीन हजार बायका कामन्स सभेस जाऊन तह करावा, अशी मनापासून प्रार्थना करूं लागल्या. त्या बोलल्या, ज्यास तह नको त्यांस आमचे स्वाधीन करा, त्या दुष्टांचे आह्मी फाडून तुकडे करूं." ती गडबड बंद करावयास चौकी- वाल्यांस कांहींसें संकट पडले, आणि त्या दंग्यांत एक दोन बायकांचे जीवही गले. मातन्मोर ह्मणून एक स्थळ आहे, तेथे लढाई झाली, तेव्हांपासून राजास विपत्ति येऊ लागली. स्काच लो- कांची फौज आणि पार्लमेंट सभेची फौज या दोन्ही एकत्र मिळून यार्क शहरास वेढा घालीत होत्या; तो वेढा राजपुत्र रूपर्ट आणि मार्कुइस न्युक्यास्तल या दोघांनी उठवावयाचा निश्चय केला. उभयपक्षींची मिळून सुमारें पन्नास हजार फौज मास्तन्मोर ठिकाणी एकत्र होऊन लढाई सुरू झाली, परंतु बहुत वेळपर्यंत जय कोणाचा होतो हा निश्चय होईना. राजपक्षी सैन्याचे उजवे बाजूचा सरदार रूपर्ट होता, त्यावर आलिवर काम्वेल ह्मणून एक पुरुष मोठ्या बंदोबस्ताची फौज घेऊन आला. तेव्हां काम्वेल याचा विजय झाला, त्यानें शत्रूस पळविले, त्यांचे पाठीस लागला, पुनः लढाई केली, आणि पुनः विजय संपादिला. राजपुत्राचा सारा तोफखाना घेतला. पराजयाचा सूड पुढे राजपक्षांच्याने कधींही उगिवला या नाहीं. या राज्याच्या प्रारंभी क्यांतर्बरी एथील आर्चबिशप