पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धरून आनंदाने घेऊन जावें, या गोष्टीचा चार्लस राजास मोठा तिरस्कार होता, कारण, असे झाल्यावर शिपाईलोक काय करितील याचे प्रमाण नाहीं, ह्मणून त्याचे मनांत भय होवें. अशा विपत्तीत त्यानें निश्चय केला की, स्काच लोकांचा आपणाशी विशेष द्वेषदृष्टीस आला नाहीं, ह्मणून त्यांचे स्वाधीन व्हावें. तो त्यांचे स्वाधीन झाल्यावर ते त्यास लवकरच बंदिवानासारिखा मोजूं लागले. राजा सांपडला ही बातमी समजतांच पार्लमेंट सभेनें राजा आपणांकडे घेण्याविषयीं स्काच लोकांशी बोलणें लाविलें. शेवटीं चार लाख पौंड देऊन राजास आपले जवळ आणिलें. असें निंद्य कर्म केल्यामुळे जे चांगले लोक होते, ते पार्लमेंट सभेची फार निंदा करूं लागले. लढाई संपली; राजाने आपले पक्षाचे लोकांस प्रयत्नां- तून सोडविलें, आणि पार्लमेंट सभेसही तिच्या फौजेशि- बाय दुसरा कोणी शत्रु राहिला नाहीं. राजाचें भय जा- तांच पार्लमेंट सभेचे लोकांत उघड फूट पडली, तेव्हां त्या समेत बहुधा प्रेस्वितीरियन मताचे लोक होते. त्यांचें मत असे कीं, धर्मपक्षी लोक असावे; परंतु फौजेंत फार करून इंडिपेंडेंट लोक असत, त्यांचे बोलणे पडलें कीं, धर्मपक्ष्यांचें कांहीं काम नाहीं. सर्वांस धर्मोपदेश करा- वयास अधिकार आहे. या जातीमध्ये मुख्य काम्वेल होता. काम्वेल याचे गुण कसे होते हैं आतां दृष्टीस पडूं लागले. तो हतिग्तन प्रांतांतले एके गृहस्थाचा मुलगा होय. त्याचा बाप आपले कुटुंबांत सर्वांपेक्षां धाकटा भाऊ होता. ह्मणून त्याचे वांट्यास दवलत फार थोडी आली