पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८८ स्त्रेट यानें स्वार आणिले ह्मणून लोकांनी दांडगाई केली, व इकडे सुमारे ६०००० लोक जमून पार्लमेंट सभेचे रीतींत फेरफार करण्याविषयी अर्जी करावयाकरितां मि- ळाले. तेव्हां तेथील वक्ता हंट साहेब यास धरून कैद केलें, लोकांची निशाणे पाडलीं, व वय पुरुष आणि स्त्री हें न पाहतां सर्वांस स्वार तुडवूं लागले, आणि वार करूं लागले. त्यामुळे लवकरच ती जमीन साफ झाली; व मेले जखमी व एव्हवीं फार दुखविले मिळून सगळे चारशे असा यावरून लोकांनी राजपुत्र रीजंट हिसाब सांपडला. इ०स० यास बहुत अर्ज्या केल्या; परंतु त्यांपासून कांहीं फळ न होतां, तशा सभाचे वगैरे बंदोबस्ताविषयीं दुसरे बैठकीत नवे कायदे ठरले; आणि लहान लहान पुस्तकांवर कांहीं कर बसवून त्यांचे छापणारांविषयी पुष्कळ बंदोबस्त केला. नवे वर्षाचे प्रारंभींच नवीं दुःखें येण्याचा प्रा- १८२० रंभ झाला. जान्युआरी महिल्याचे २३ वे तारिखेस, डेवनशर प्रांतात सिड्मौथ एथें ड्युक फेंट ( राजाचा मुलगा) खोकला होऊन मरण पावला. तें व्याधि- दुःख ड्युक यानें मोठ्या विवेकानें सहन केलें, आणि त्याचे बायकोनेही यास बहुत विश्रांति दिली; परंतु त्याचा मृत्यु जवळ आला, त्यास मनुष्याचा उपाय चा- लला नाहीं; आणि तो मेल्यावर विद्येचे मित्र आणि गरीब यांचा मोठा आश्रय, आणि इंग्लंड एथील राज कुटुंबाचें मोठें भूषण गेले. यापेक्षांही दुसरी वाईट गोष्ट घडली. राजाचें शरीर फार क्षीण होऊन तो जान्युआरी महिन्याचे २९ वे तारिखेस शनिवारी रात्री ८ वाजतां मृत्यु पावला