पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८७ व पेन्साकोला ही ठिकाणे घेतलीं, परंतु ती पुढे लवक- रच स्पानिश सरकारास परत दिली. यामुळे त्या दो- नही सरकारांत कागद पत्रे चालू झालीं; आणि जनरल यानें ही गोष्ट, सभेस निरोप पाठविला त्यांत जाणविली. इकडे इंग्लंड देशामध्ये त्या वर्षी पीक चांगले आलें, कामधंदा वाढला, व लोकांची मनें पार्लमेंट सभेच्या ने- मणुकीकडे लागला; त्यामुळे सर्वत्र स्वस्थता झाली. मांचे- स्तर शहराजवळ मात्र कामकरी लोकांत कांहीं दुष्ट बुद्धि उत्पन्न झाली होती; परंतु लागलेच तेथे लढाऊ लोक आल्यामुळे त्यांच्यानें कांहीं दंगा करवला नाहीं. राणीची प्रकृति कांही दिवसांपासून जळोदरामुळे क्षीण होत चालली होती; ती शेवटीं कित्येक दिवसपर्यंत फार दुःख पावून शेवटीं नवेंबर महिन्याचे १७ वे तारिखेस मृत्यु पावली, व तिचें प्रेत विड्सर एयें पुरलें. नवे पार्लमेंट सभेची बैठक जून महिन्याचे १४ वे तारिखेस झाली; आणि तींत प्रथम राणीचे मृत्यूमुळे विड् सर एथील नेमणूक कमी करून ती दर वर्षास ५०००० पौंड ठरविली; व ड्युक यार्क यास राजाचे शरीराची खबरदारी करण्याकरितां १०००० पौंड नेमणूक ठर- विली. त्याच बैठकीत बांक यानें रोकड पैका देणे चालू करावें, असा बंदोबस्त केला. या वर्षांत राज्यामध्ये लोकांच्या सभा होऊन सरका- रास विरुद्ध गोष्टी उघड बोलून भयंकर बेत करण्याचा प्रारंभ झाला. त्या एक दोन सभांतील मुख्य बोलणा- रांस धरून जामीन घेतले व कैद केलें. नंतर आगष्ट महिन्याचे १६ वे तारिखेस मांचेस्तर एथील माजि-