पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८९ त्या वेळेस त्याचे वयास ८२ वें व राज्यास ६० वें वर्ष होते. त्याचें शरीर व त्याचे प्रीतींतील मुलांचें शरीर हीं दोनही विंडसर एथील राज कुटुंबाचे कबरींत पुरलीं, आणि ब्रिटिश राज्याचें प्रभुत्व चतुर्थ जार्ज राजाजवळ आलें. या मायाळू राजास प्रजांचा बाप असे वास्तविक ह्मणत असत; आणि तो एथून उत्तम लोकास गेला, तेव्हां त्यांनीं त्यासाठी फारच शोक केला. त्याची मान्य आकृति सर्वांचे नेत्रांपुढे दिसत असे. त्याचे गुण सर्वांचे हृदयावर लिहिले होते; आणि त्याची यथायोग्य स्तुति करण्यास आपणास सामर्थ्य नाहीं, असे मोठमोठे वक्ते आणि ग्रंथ. कर्ते ह्मणत आहेत.. समाप्त.