पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८६ सणे जरूर नाहीं. असा विचार ठरून ती फौज जिकड- ची तिकडे गेली. मे महिन्याचे ६ तारिखेस रिओडीजनिरो एथें भूम- ध्य रेषेचे उत्तरेस गुलामांचा व्यापार अगदी बंद व्हावा; ह्मणून पोर्तुगल एथील राजाने कायदा केला; तो असा कीं, तो व्यापार जे करितील त्यांवर कांहीं दंड वसविला, .व या कायद्याप्रमाणे जे गुलाम सुटतील, त्यांचे चरितार्था करितां व रक्षणाकरितां बंदोबस्त केला. तथापि मध्य रेषेचे दक्षिणेस या व्यापाराचा कांही बंदोबस्त मात्र केला. स्वीडन देशांत फेब्रुअरी महिन्याचे ६ वे तारिखेस राजा चालिस १३ वा मृत्यु पावला. नंतर पूर्वी जो बोनापार्ट याचे चाकरींत होता, तो जनरल बर्नाडोट त्या तक्तावर बसला. सिंहल हिंदुस्थानांत पेंढारी व तेथील राजाचा जमाव यांशीं इंग्लिश यांस लढाईचा प्रसंग पडून शेवटीं पेशवा पद- च्युत झाला; आणि मराठ्यांचे राज्य मोडलें. द्वीपांतही कोणी राजाचे कुटुंबांतील पुरुषानें बंड केलें होतें, परंतु तेथील गवर्नर सर आर ब्रौन रिग याचे उद्योगानें तें मोडले गेलें. अमेरिका खंडांत युनैटेडस्टेट्स एथील सरकार व इंडियन लोकांची एक जाति सेमिनोल्स ह्मणून प्लारिडा प्रांताचे कांठावर राहत होती, या दोघांशी लढाया कांहीं दिवसपर्यंत चालल्या होत्या. त्या लोकांस कांहीं उपद्रव करूं देणार नाहीं. असा स्पानिश यांनी करार केला होता. त्या लोकांचे पाठीस लागून जनरल जाक्सन यानें प्लारिडा प्रांताचे हद्दी पलीकडे जाऊन सेंट मार्क्स