पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पूर्वी शासने केली, त्यामुळे चांगला बंदोबस्त झाला; परंतु लंडन शहरांत मात्र कित्येक लबाड लोक आहेत, त्यांची चांगली, चौकशी राखिली पाहिजे; व प्रधानांस पूर्वीचे बैठकीत जो अख्यार दिला होता, त्याप्रमाणे त्यांनीं विचार पाहून कित्येकांस शासनें केलीं, व कित्येकांस सोडिलें. असा तो रिपोर्ट गेल्यानंतर सर्व बंडवाल्यांस माफीचा कायदा बहुत विघ्नें येऊन शेवटीं सर्वांचे संमताने ठरला. मार्च महिन्यांत नवीं देवळें वांधण्याबद्दल दाहा लक्ष पौंड नेमणूक केली. एप्रिल महिन्याचे १३ वे तारिखेस राजपुत्र रीजंट यानें कळविलें कीं, ड्युक कारन्स याचें प्रिन्सेस मिनिंगन इशीं, व ड्युक केंब्रिज याचें प्रिन्सेस हेसी इशीं, अशीं दोन लग्ने होणार आहेत. ह्मणून त्या दोघेही राजपुत्रांचे पहिले नेमणुकीपेक्षां ६००० पौंड प्रतिवर्षास जास्ती वाढ- विले; आणि त्यांचे मागें त्यांच्या बायका वांचल्यास त्यांस तितकी नेमणूक पोंचावी असे ठरविलें. पुढले महिन्यांत ड्यूक केंट याचें लिनिजेन एथील राजकन्येशीं लग्न झा ल्यावर तितकीच नेमणूक व्हावी असे ठरविलें. त्या बैठ- कांत राजपुत्राचे कारभाराविषयी कायद्यांत फेरफार केला; आणि गरीबांस विद्या शिकवावयाकरितां ब्रूम साहेबाने कायदा काढिला होता, त्याचा विचार करण्याविषयी कमि- टी नेमिली. त्या बैठकीचे शेवटी पार्लमेंट सभेस नि- रोप झाला. फ्रान्स एथे चांगली वहिवाट चालल्यामुळे एस्ला शा. पेल एथें युरोपियन राजांची सभा होऊन ठरलें कीं, आतां तेथें रखवालीकरितां बाहेरचे संस्थानांची फौज अ-