पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८४ संन् १८१७ मध्ये युरोप खंडांतील राज्यांत कांहीं मोठा फेरफार झाला नाहीं. एंपरर आलेक्झांडर यानें हैं वर्ष आपले राज्य बळकट करण्यांत, व्यापाराची पेढी उत्पन्न करण्यांत, आणि बाहेरचे लोकांनी आपले राज्यांत राहावें, अशा सोई करण्यांत घालविलें. स्वीडन देशांत राजाचा जीव घेण्याकरितां बंड झाले होते, तें कळल्यावर लोकांनी राजाविषयीं आपला स्नेहभाव प्रगट केला. जर्मनी देशांत साक्सवीमर एथील संस्थानानें स्वतंत्र राज्यरीति केली, परंतु विर्टिमवर्ग एथें राजानें जो विचार सांगितला, तो लोक मान्य करीनात, ह्मणून त्याने आपले संस्थानांची सभा रद्द केली. नेदर्लंड देशांत पूर्वी चीन देशाचा व्यापार कर- णारी व्यापारी लोकांची एकच मंडळी होती. ती बंद करून तो व्यापार करावयास सवींस मोकळीक दिली, या- मुळे सरकारची कीर्ति झाली. जान्युआरी महिन्याचे २८ वे तारिखेस कमिशन यांनीं सभेची बैठक चालू केली, आणि त्या प्रसंगी राजपुत्राचें भाषण वाचलें, त्यांत सांगितलें कीं, गुलामांचा व्यापार अगदी बंद व्हावा, याविषयीं स्पेन व पोर्तुगल एथील दर- बारांशी तह केले; राज्यांत कामधंदा चांगला चालून वसूल वाढत आहे; आणि दुसरें सांगितले कीं, लोकही वाढत आहेत. हेबियसकार्पस याची तकूबी मनाकरण्याविषयी पार्ल- मेंट सभेत निश्चय ठरला, त्यावर राजपुत्रानें देशाचे स्थि तीविषयों कित्येक कागद त्यांजवळ पाठविले. त्यांची चौ कशी करण्याकरितां जी कमिटी नेमिली होती, तिनें ता- रिख २३ फेब्रुवारी ते दिवशीं रिपोर्ट केला की,