पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८३ करावला; राजाचे प्रमाणे राजपुत्राचे शरीराचे संरक्षणा- विषयीं कायदा केला; आणि लोकांचे मंडळ्यांविषयी पूर्वी झालेले कायद्यांची वहिवाट चालू केली. आबट साहेब पांच पार्लमेंट यांमध्ये कामन्स सभेतील मुख्याचे ठिकाणीं होता, त्यानें मे महिन्याचे ३० वे तारि- खेस ती जागा सोडिली. तेव्हां त्यास लार्ड कोल्चेस्तर असा किताब व प्रति वर्षास ४००० पौंड नेमणूक होऊन तो लार्ड सभेत गेला. जून महिन्याचे प्रारंभी देशाचे स्थितीविषयीं दुसरा एक निरोप राजपुत्राकडून गेला, ते- व्हां हेवियसकार्पस कायदा फिरून तकूब केला. नंतर त्या महिन्याचे १२ वे तारिखेस राजपुत्राचें भाषण होऊन ती सभेची बैठक उठली. स्पाफील्डस बंडांत वाट्सन, प्रेस्तन, हूपर, आणि थिस्लबूड हे चार असामी होते, ह्मणून त्यांची चौकशी झाली; परंतु त्यांवर गुन्हा लागू झाला नाहीं, ह्मणून त्यांस सोडिलें. डर्वी एथें लोकांनी फार लबाड्या केल्या होत्या, तेथील तीन आसामी ब्रांडेथ, लडलाम, आणि टर्नर हे सरकार गुन्हेगार ठरून त्यांस ठार मारिले. दुसरे त्यांचे साथी नऊ यांस त्यांपेक्षा कमी शासन केलें, आणि बारांस क्षमा केली. राजकन्या शार्लट, जिचे लग्नाचें वर्तमान पूर्वी लिहिलें, ती बाळंत होऊन नोवेंबर महिन्याचे ६ वे तारिखेस मृत्यु पावली, त्यामुळे राज्यांत सवींस फार दुःख झालें. शरीर विड्सर एथें राजकुटुंबाचे कबरींत पुरलें, आणि त्या दिवशीं जो समारंभ झाला, तो स्मरणांतून लवकर गेला नाहीं. तिचें ३२