पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८२ कांचा रोजगार नाहीसा झाला; आणि त्या वर्षी पर्जन्य चांगला पडला नाहीं, ह्मणून गरीब शेतकरी लोकांस अ- नही मिळेना असे झाले; यामुळे बहुत ठिकांणी सभा क रून लोकांनी या गोष्टीच्या कारणाचा विचार आरंभिला; आणि कर कमी करावे, व कामन्स सभेत फेरफार करावे, अशा बहुत अर्ज्या पार्लमेंट सभेस दिल्या. या जातीच्या लोकांच्या दोन सभा वर्षाच्या अखेरीत इसलिंग्टन गांवा- जवळ स्पाफील्ड्स या ठिकाणी झाल्या; त्यांतील शेवट- च्या सभेत वाट्सन या नांवाचे एके जवानाने गाडींतून कांहीं दांडगेपणाचें भाषण करून कितीएक नव्या तऱ्हे- चीं निशाणे दाखविलीं. त्यावरून लोक त्याचे पाठीमागून शहरांत शिरले. स्नोहिल एथें बेकिथ साहेबाचें दुकान लुटण्याचा उद्योग केला; तेथें प्लाट नामें गृहस्थ होता, तो त्यास बोध करूं लागला, तेव्हां त्यानें त्यास पिस्तुलाची गोळी मारून फार जखमी केले. या अन्यायासाठी त्यास धरून कैद केलें; परंतु पुढे गडवड झाली, तींत तो पळून गेला. नंतर त्या वंडवाले लोकांनी शहरांत जाऊन बहुत दांडगाई केली; परंतु माजिस्ट्रेट व लढाऊ शिपाई यांनी मेहनत करून त्यांस चहूकडे घालवून दिले. जान्युआरी महिन्याचे २८ वे तारिखेस राज- पुत्र पार्लमेंट सभेची बैठक चालू करण्याकरितां स्वतः गेला होता. तो तेथून येत असतां कोणी त्यावर गोफिणीचा दगड मारिला, तो त्याचे गाडीवर व सून एक भिंग फुटलें. दुसरे महिन्याचे आरंभी राजपु त्रानें देशाचे स्थितीविषयीं निरोप पाठविल्यावरून पार्लमेंट सभेनें हेबियसकार्पस कायदा कांही दिवसपर्यंत तक्रूव इ०सं० १८१७