पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३ हिवाळ्यांत पुढचे लढाईची तयारी करावी, आणि वे स्तमिनस्तर एथील पार्लमेंट सभेची मसलत सिद्धीस जाऊं नये; ह्मणून राजानें आक्सफर्ड शहरांत दुसरी एक नवी पार्लमेंट सभा बोलाविली. दोन पार्लमेंट सभा एके समयींच अशा इंग्लंड देशांत पूर्वी कधीं झाल्या नव्हत्या. नवे लार्ड सभेत बरेच गृहस्थ होते; परंतु कामन्स सभेत एकशे चाळीस मात्र होते. त्याच्या दुप्पट लोक लंडन एथील कामन्स सभेत होते. या पार्लमेंट सभेपासून त्यास कांहीं थोडासा पुरावा झाला. पुढे त्यानें तीस नि- रोप दिला; आणि पुनः कधीं त्यांची सभा केली नाहीं. त्या वेळेस प्रजापक्षी पार्लमेंट सभेनें हुकूम ठरविला कीं, लंडन एथील लोकांनीं एक अठवड्यांत एक जेवण कमी कमी करावें; आणि त्याचा पैका सरकारास द्यावा. स्काच लोकांस आपली आणि इंग्लिश यांची स्थिति सारिखीच. असे वाटून त्यानी पार्लमेंट याचे मदतीस कांहीं फौज पा- ठविली, तीपासून मोठें कार्य झालें. पूर्वेस अर्ल मांचेस्तर याचे हाताखाली त्याचे पक्षाची चवदा हजार फौज होती; एसेक्स याचे हाताखालीं दहा हजार होती, आणि तित- कीच सर विलियम वालर याजवळ होती. इतकी बळ- कट फौज जमवायाचें राजाचें सामर्थ्य नव्हतें, आणि त्या फौजेजवळ सामानाचा आणि दारू गोळ्याचा पुरावा होता; तसाच त्यांस दरमहाही चांगला पोहोचत होता. हिवाळ्यांतही ज्या लढाया केवळ बंद झाल्या नव्हत्या त्या उन्हाळ्यांत अधिक आवेशाने चालू झा- ल्या. त्यांपासून कोणाचा जय पराजय तर झाला नाहीं; परंतु राज्यांत मनुष्यांचा संहार मात्र झाला. इ०स०१६४४