पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८१ कैद केलें होतें, आणि तो त्यास सोडीना; त्याचे कुटुंबाची माणसे मात्र गुप्त वेषाने पळून गेली होतीं. २७ वे तारि- खेस अरमार दृष्टीचे टप्यांत आले, आणि लार्ड एक्समौध यानें तहाचें निशाण पाठविले. त्याचें उत्तर आलें नाहीं, गलवतें आपापले ठिकाणीं जाऊन तोफांचा मार ह्मणून चालविला, तो संध्याकाळीं तीन तासांपासून नऊ तासपर्यंत चालला होता. त्यावर डे यानेंही धक्क्यावरून व शहरां- तोल उंच ठिकाणांवरून तोफा मारिल्या; परंतु दुसरे दि वशी सकाळी डे आणि त्याचे प्रधान यांनीं, जिकडे तिकडे ओसाड झालें, व ४४ तोफांची चार मोठी फ्रिगेट, २४ पासून तीसपर्यंत तोफांचीं गलबतें पांच, आणि कित्येक तोफांच्या होड्या, आणि दुसरी बहुत जाहाजें फुटलीं; आणि तोफखाना, कोठारें आणि अरमाराचें सामान सर्व खर्च झाले, असे पाहून त्यांची हिमत खचली. मग लार्ड एक्समौथ यापासून दुसरें पत्र येतांच डे त्याचे करारांस मान्य झाला. ते करार हे, सर्व क्रिस्तियन बंदिवान फुकट सोडावे; त्या वर्षांत निआपोलिटन किंवा सर्डनि- यन मोकळे करण्याबद्दल जो पैका घेतला असेल तो परत द्यावा; पुढे लढाईंत धरलेले बंदिवानांस युरोपियन लो- कांचे चालीप्रमाणे वागविण्याचें वचन द्यावें; आणि असाच तह नेदर्लंड एथील राजाशीं करावा. हा करार डे यानें मान्य केला, आणि इंग्लिश वकिलास कैद केल्याबद्दल त्या- जवळ क्षमा मागितली. नंतर सप्टेंबर महिन्याचे ३ रे ता- रिखेस लार्ड एक्समौथ तेथून निघून आला. इकडे देशांत फार दिवस लढाई चालली होती, ती अ कस्मात बंद झाल्यामुळे कारागीर व मजूरी करणारे लो-