पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८० केली; आणि चहूंकडून अर्ज्या फार आल्या, त्यामुळे ए- क्सचेकर याचा चान्सेलर यानें जिनगीवरचा कर पुनः चालू करण्याचा बेत योजिला होता, तो राहिला. मार्च महिन्याचे १४ वे तारिखेस राजपुत्रापासून नि- रोप आल्यावरून राजकन्या शार्लेट इचें प्रिन्स लिओ- पोल्ड आफ साक्सकोबर्ग याशी लग्न झाल्यावर त्या दो- घांस मिळून ६०००० पौंड नेमणूक करून दिली; व क- रार ठरविला कीं, राजकन्या अगोदर मेल्यास ५०००० पौंड नेमणूक चालावी. प्रिन्स यास ब्रिटिश प्रजांचा अधिकार येण्याकरितां एक कायदा केला; आणि प्रारंभी खर्चासाठीं दुसरे ६०००० पौंड दिले. मे महिन्याचे २ रे तारिखेस कार्लटन हौस एथें त्या दोघांचें लग्न मोठ्या उत्साहानें झालें; आणि राज्यांतील सर्व प्रदेशांतून स्तुति- पत्रे येऊ लागली. जुलै महिन्यांत राजकन्या मेरी, व तिचा चुलत भाऊ ड्युक ग्लास्तर या दोघांचे लग्न झालें, आणि पार्लमेंट सभेने त्या दोघांचा चांगले रीतीनें चरि- तार्थ चालावयाजोगी नेमणूक करून दिली. आफ्रिका खंडामध्यें आल्जियर प्रांतांतील लोकांनी समुद्रांत चांचेपणा आरंभिला, आणि बोना एथें पोंवळीं समुद्रांतून काढण्याचे उद्योगांत कित्येक क्रिस्तियन लोक लागले होते, त्यांचा त्यांनी निर्दयपणे प्राण घेतला होता; ह्मणून त्यांचे पारिपत्य करण्यासाठी लार्ड एक्समौथ मोठें अरमार घेऊन निघाला; जिब्राल्टर शहरास येतांच त्यानें आल्जियर्स एथील इंग्लिश वकील व त्याचे कुटुंब आणावयाकरितां एक गलबत देऊन क्याप्टन डाशवूड यास पाठविले. परंतु इंग्लिश वकिलास तेथील डे यानें