पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुलाचे नांवे लिहिण्याची मसलत ठरविली. यावर चेंबर * यानी एक स्तुतीचा निरोप पाठविला, परंतु त्याचे मुलाचें अधिकाराचा विचार शाहणपणानें चुकविला. फ्रेंच फौजेंतून जी बाकी राहिली होती, ती लोन शह- रास गेली. मग कांहीं अडचण न पडतां फौजांचा जमाव वाटलू एथून पारीस शहरास गेला. क्यांव्रे शहर सर चालिंस कालविल यानें तटांवर चढून घेतलें. सेंट किं टन मार्शल व्लकर याचे हाती लागलें; आणि दुसरे बहुत पराक्रम केले. असे सर्व झाल्यानंतर कीर्तिमान वेलिं- ग्तन आणि ब्लकर हे जुलै महिन्याचे ६ वे तारिखेस पा- रीस शहरांत शिरले, आणि ८ वे तारिखेस त्यांनी राजास आपले पूर्वजांचे वाड्यांत आणिलें. नंतर बोनापार्ट अमेरिका देशांतील युनैटेडस्टेट्स प्रांतांत जाण्याचे बेतानें राशफोर्ट एथे गेला; परंतु त्या कांठाजवळ अरमार ठेविले होते. त्यास चुकवून जाण्याची संधि बहुत दिवसपर्यंत पाहून शेवटी त्यानें राजपुत्र रोजंट यास विनंतीपत्र पाठविलें कीं, आतां मला आश्रय द्यावा, परंतु हा त्याचा मनोरथ सिद्धीस गेला नाहीं; कारण कीं, सर्वांनीं एकमत करून त्यास सेंट हेलीना वेटास पाठ- वावें असें योजिलें होतें. पुढे त्यास जनरल बोनापार्ट असा मात्र किताब देऊन तेथें पाठविलें. फ्रान्स व एकमत झालेले राजे यांमध्यें तहनामा ठरा- वयास कांहीं दिवस लागले; परंतु शेवटी त्यावर पारीस शहरांत नोवेंबर महिन्याचे २० वे तारिखेस सह्या झाल्या. ब्रिटिश पार्लमेंट सभेची बैठक कमिशन यांनी चाल सभा.