पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८ फार धांदल होऊन ते मागे हटले. अशा संकट समयी • शूर डयुक वेलिंग्तन यानें आपले सर्व पायदळ, व त्याचे मागून स्वार आणि तोफखाना शत्रूंवर घातला. तेव्हां फौजेची पहिली ओळ मागें हटून दुसरीवर पडली; आणि ती पडतांच दुसरी लागलीच मोडली. नंतर फ्रेंच यांची इतकी धांदल झाली की, त्यांनी आपला सर्व तोफखाना, बुणगें, व दुसरें सर्व सोडून दिले; आणि ब्रिटिश जनरल याचा उद्योग सफळ झाला. या प्रसंगी बोनापार्ट यानें लढाईत १३०००० लोक आणिले होते. त्यांनी मोठ्या निकरानें ही लढाई केली; परंतु या पळण्यानंतर ते आपलीं शस्त्रे टाकून जिकडे ति कडे गेले. जनरल बुलो आपण शत्रूंचे बाजूस राहून प्रशियन स्वारांचे १६ पळटणीसहित सारे रात्रभर त्यांचे पाठीस लागला, त्यामुळे सारे वाटभर मेलेले व मरणारे लोक शस्त्रे बुणगें, हीं पडत गेलीं; आणि बोनापार्ट याचा वसावयाचा रथ, तबक, आणि कागद विजयी लोकांचे हाती लागले. सुमारे तीनशे तोफा, व सुमारें १४००० वंदिवान सांप- डले. फ्रेंच यांचे मेले व जखमी मिळून ५०००० लोक पडले, व फौजांचे जमावांतून तीस हजार पडले. आपले फौजेची अशी फाटाफूट झाली पाहून बोनापार्ट भोठ्या त्वरेनें विसावे तारिखेस रात्रीस पारीस शहरांत आ ला; आणि त्यानें दुसरे दिवशीं आपले प्रधानांस स्पष्ट सां- गितले की, माझी फौज आतां राहिली नाहीं. तेव्हां प्रां- तांचे वकील यांनी आपली बैठक आतां शाश्वत असें जा हीर केलें; आणि त्या दिवसांत त्याकडून राज्य सोडून त्याचे