पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७७ तो तत्क्षणी आपले फौजेसहित निघाला. सर टामस पिक्टन याची टोळी, ड्युक ब्रनस्विक याचें लश्कर, आणि नासो टोळी इतकें लश्कर सोळावे तारिखेस दोन प्रहरांनंतर दोन तास दिवसाचे सुमारे काटरवा एथें पों- चलें; तेथे शेवटी एर्लन आणि रैलयांचें पायदळ, व कि- लेर्मा याचे हाताखालची स्वारांची टोळी यांनी त्यांचा अगदी मोड केला, व शूर ड्युक ब्रनस्विक मारिला गेला. त्यांनी प्रशियन यांवरही लिंग्ग्री एयें हला केला; आणि मोठी लढाई होऊन प्रशियन सुमारें १४ मैल अंतरावर वेवर एथे आणि ब्रिटिश सुमारें १६ मैल अंतरावर वा टर्ल एथे आपल्या मकाणावर येऊन राहिले. ते असे की जसा प्रसंग पडेल तसी दोघांनी एकमेकास मिळून मदत करावी, किंवा दोघांनीं शत्रूंचे पाठीस लागावें. त्या महिन्याचे १७ वे तारिखेस कांहों मोठें वर्तमान घडलें नाहीं; परंतु दुसरे दिवशीं वांडाम याचे टोळीवां- चून सर्व फ्रेंच फौजेचा मार ड्युक वेलिंग्तन याचे लश्क रावर पडला. त्याचें लश्कर त्या वेळेस ब्रसल्स शहरा- हून १५ मैल अंतरावर शार्लिरोआ व निवेल्स यापासून ज्या वाटा जातात त्यांवरून जात होतें. ब्रिटिश फौजेने तळ दिला होता, त्या ठिकाणी त्यांचे उजवे बाजूचे समोर फ्रेंच यांनी मोठा हल्ला करून लढाई सुरू केली. तसाच त्यांचे सर्व लश्करावर तोफांचा मार चालू केला, आणि वारंवार पायदळ व स्वार यांचे रात्रीं सात तास वाजत तंवपर्यंत हले केले; आणि तेव्हां त्यांची डावी बाजू हटवावयाकरितां मोठा प्रयत्न केला; परंतु त्यांत सोठी लढाई होऊन फ्रेंच यांचा मोड झाला, आणि त्यांची