पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपले फौजेचा बंदोबस्त तयारी करून यांनी आपले रा ज्यावर हल्ला करावयाची वाट न पाहतां, बेलजियम प्रांतांत जाऊन तेथें पराक्रम करून शत्रूचा मोड करण्याची मस- लत केली. या वेतानें तो बोनापार्ट पारीस शहरांत आपले मागे कारभार चालवावयाकरितां जनरल सिवास्तियानी ग्री- नियर, वोमो आणि कपानो यांस ठेवून जून महिन्याचे ११ तारिखेस निघाला. तो १३ वे तारिखेस आवेन एथे पोचला; आणि त्या ठिकाणी शत्रूवर अकस्मात् हल्ला करावा, अशा बेताने त्यानें शिपायांस सांगितलें कीं, १४ वो तारीख मारिंगो व फ्रीडलंड एथें लढाया झाल्या, तो दिवस आहे; आणि ज्यांस धैर्य आहे, असे सर्व फ्रेंच लो- कांस जय मिळविण्याचा किंवा मारण्याचा हा क्षण आला आहे. असा लश्करास उपदेश करून त्यानें आपली फौज उद्योगास लाविली. सांबर नदीवर प्रशियन यांनी तळ दिला होता; परंतु त्यावर त्यानें १५ वे तारिखेस सका- ळी हल्ला केला; आणि त्या दिवसांत त्यांस नदीपासून मागे हटवून थुई यापासून फ़ुरस यापर्यंत सुमारें १६ मैल जमीन साध्य केली; आणि तशीच ब्रसल याचे वाटेवर बेल्जियन फौजेस काटरव्रा एथे सुमारें १२ मैल मागे हटविलें, बेलजियन यांस फिरून पुरााव होऊन त्यांनी गेलेले जमिनींतून कांहीं पुनः घेतली; परंतु संध्याकाळी बोनापार्ट याकडचाच विजय होऊन त्यानें शालिरोआ एथें तळ दिला. ही बातमी ड्युक वेलिंग्तन यास रात्री समजली तेव्हां