पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आणि त्यांची मनें राजाकडे होतीं, ह्मणून त्यांवर त्याचा सर्व भरंवसा होता. विसावे तारिखेस सकाळीं राजाची फौज लढाईची तयारी करून फांटेब्लो व पारीस यांचे वाटेवर डोंगराचे खा- लचे बाजूस सखल जागेत वाट पाहत होती; इतक्यांत प्रथम घोड्यांचे पाय ऐकावयास येऊ लागले आणि पुढे बोनापार्ट याचा उघडा रथ व बरोबर कांहीं घोडेस्वार असे जलद यांचे नजीक येऊन पाँचले, त्यांस पाहातांच राजपक्षाचे लोक " बोनापार्ट बहुत वांचो,” इत्यादि वि जयाचे शब्द करीत लागलेच त्यास मिळाले, आणि तोही आपले उजवे बाजूस वत्रांड, आणि डावे बाजूस डुए यांस घेऊन हात वर करून शिपायांस ह्मणाला 66 " माझे मित्र हो, युद्धांतील माझे सोबतीहो, तुमची अवरू, कीर्ति, आणि देश राखावयांस मी आलों." नंतर आपला हुकूम चालेना, आणि दंगा होऊं लागला, असे पाहून राजाचे सरदार पळाले; शिपाई लोक आनंदाने ओरडूं लागले; आणि इकडले व तिकडले लोक वैर सोडून एकमेकांस भेटू लागले. या रीतीनें तो जुलुमगार बोनापार्ट पुनः एकदां पारीस शहरास येऊन पोचला. तो येण्याचे पूर्वीच हतभाग्य राजा तेथून निघून लील शहरास गेला होता, तेथून निघून त्यास लवकरच घेंट एथे जाणें प्राप्त झालें. आतां बोनापार्ट यास वाटलें कीं, आपले राज्य स्थिर झाले, परंतु हे वर्तमान पूर्वीचे एकमत झालेले राजांस कळ- 'तांच त्यांनी तो लुच्चा असे जाहीर करून, सर्वांनी मिळून व्यास मोडावे असा तह केला. तें जाणून त्यानेही इकडे