पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ रर बहुत वांचो" असा शब्द करून उत्तर दिले; आणि ते त्यास मिळाले. बोनापार्ट यास ग्रिनोडल एथे लोकांचा बहुत पुरावा झाल्यावर तो लोन्स शहरावर गेला. तेथें ११०००० लोकांची वस्ति होती. एथें लोकांस वास्तवीक राजाच्या पक्षाचें अगत्य होतें; आणि त्यांनीं राजाचा भाऊ डयूक आ लियन्स, मार्शल माक्डनल्ड, आणि जनरल सेंसिर हे पारीस शहराहून आले तेव्हां त्यांची आदराने भेट घेतली. परंतु तेथील रखवाली सरदारांस बोनापार्ट याचा पक्ष होता, व ते शिपाई " बोनापार्ट बहुत वांचो” शब्द करीत त्यास मिळाले. नंतर राजाचा भाऊ व मा. र्शल माक्डनल्ड, मेयर वगैरे ८ वे तारिखेस शहराहून निघून गेले. असे मार्शलने यानें पूर्वी राजाचा पक्ष फार दाखविला होता; परंतु त्यानेंच आतां जाहीरनामा लाविला कीं, बुब वंशास राज्याचा अधिकार अगदीं नाहीं, ह्मणून सर्व शिपायांनी बोनापार्ट यास मिळावे. मग त्यानें आपले हाताखालचे सगळे फौजेची प्रतिज्ञा सही केलेली सरकारास पाठविली. ती अशी की, आह्मी लुइ १८ वा याचे पक्षाची लढाई करणार नाही, परंतु बोनापार्ट यासाठी आपले सर्व रक्त पाडू त्या महिन्याचे १९ वे तारिखेस बोनापार्ट याने सुमारें पंधा हजार बळकट फौज, व आपले डावे व उजवे बाजूस दुसऱ्या टोळ्या घेऊन फांटेब्लो एथे तळ दिला. पुढे जाऊं नये ह्मणून १००००० लोक मिलं एथे जमले, त्यानें