पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७३ घैट एथे तहाचे मूळ कलमांवर कमिशनर यांनी सह्या केल्या, व पुढे थोडे दिवशीं प्रिन्स रोजंट यानें ती काईम केली. तेव्हां लोकांस असे वाटलें, कीं या पुढे युरोप ए फार दिवसपर्यंत स्वस्थता राहील, आणि व्यापार व कळा कौशल्ये ही वाढून सर्व सुखी आणि तृप्त होतील; परंतु बो- नापार्ट याचे बुद्धीस विश्रांति नव्हती, ह्मणून त्यानें पुनः आपले राज्य घेण्याची मसलत केली, व त्याचे स्नेही फ्रेंच दरबारांतही फार होते; ह्मणून त्यांनीही मदत करून दंड उत्पन्न केलें. आणि लढाईचा प्रसंग आणिला. कर्नल क्यांपवेल ह्मणून ब्रिटिश कमिशनर एल्वा एथें होता, तो फ्लारेन्स यास गेल्यावर मागें बोनापार्ट फे- ब्रुअरी महिन्याचे २६ वे तारिखेस एके गलबतावर वसून गेला, व त्याचे मागून पोल कार्सिकन नेपोलिटन व एल्बा एथील लोक सगळे मिळून अकराशे चार लहान गलबतांवरून गेले. मार्च महिन्याचे १ ले तारिखेस ते लोक जुआन एथील समुद्रांत कान्स एथें उतरले. आणि त्याच संध्याकाळी तीन हजार शिपायांचें जेवण तयार करण्याचा हुकूम मेयर यास आला. दुसऱ्या तारखेस बोनापार्ट तेथून निघून तीन दिवसांनी ग्रिनोब्ल शहरास गेला. त्या शहरांत रखवालदार व लढाऊ पलटनें होतीं, व तेथे जनरल मार्चड सरदार होता. आपला पक्ष शिपायांस आहे, असे समजून बोनापार्ट आपली छाती उघडी टाकून बोलला, “शिपाई हो, मी मृत्यूस भितों असें तुझी ऐकिले आहे. बरें माझी छाती एथें आहे, तर तुमची मर्जी असल्यास यावर गोळी मारा. यावर शिपायांनीं “एंप-