पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७२ करण्यासाठी बहुत मेहनत केली, ह्मणून लोकांचा त्यांवि षयी आदरही प्रगट झाला. ग्याझेट वर्तमान पत्राचा अधिक एक कागद जून महि न्याचे २ रे तारिखेस छापून जाहीर केलें कीं, गेले रा- त्रीस फ्लांटा साहेब बाहेर देशचे कारभाराचे वाड्यांत त्रि- टिश व फ्रेंच या दोघांमध्ये शेवटचा काईम तहनामा तयार करून घेऊन आला आहे. त्या महिन्याचे २० वे तारिखेस तह झाला, असे प्राचीन चालीप्रमाणे जाहीर असा विजय होऊन फार दिवसांची व मोठी लढाई संपली, ह्मणून जुलै महिन्याचे ७ वे तारिखेस राजपुत्र रीजंट याचे सखे व चुलत भाऊ पार्लमेंट सर्भेतील गृह- स्थ मोठमोठे कामगार, न्यायाधीश, व दुसरे लोक या सवींनीं सेंटपाल याचे देवळांत मोठ्या समारंभानें जाऊन ईश्वराचा स्तव केला. आगस्ट महिन्याची १ ली तारीख सोमवार ते दिव- शी इंग्लंड एथील तक्तावर बस्विक एथील कुटुंबाचा मूळ पुरुष बसला; तो व नैल नदीत जय झाला, तो दिवस ह्मणून लोकांनी उत्साह करावा, असे ठरवून पार्क एथे लोकांचा मोठा जमाव झाला, आणि रात्री सपेंटैन नदीवरील लढाईची चित्रे लाविलीं, आणि फार दारुकाम जाळले. संन् १८१४ चे शेवटी ग्रेटब्रिटन व अमेरिका एथील युनैटेडस्टेट्स या चालली हो- ती ती संपली, आणि डिसेंबर महिन्याचे २४ वे तारिखेस