पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ याचा भाचा रूपर्ड होता, त्याशीं एक लहानशी लढाई झाली तींत पहिला पडला; आणि न्यूबेरी एथील लढाईंत दुसरा हांण्डेन गलबतांचाकर देईना ह्मणून पूर्वी सांगितलें त्याप्रमाणेंच त्याचें पुढेही आचरण असे, ह्मणून शत्रूही प्रशंसा करीत. भाषणामध्ये प्रौढता; वादामध्ये शांतता, युक्ति, आणि वक्तृत्व;आणि राज्य कारणाविषयीं सूक्ष्म बुद्धि, हे गुण त्यामध्ये असत. यापेक्षा फाल्क्लंड यामध्ये गुण फार सरस होते. हाण्डेन किंचित् आग्रही होता; परंतु फाल्क्लंड यामध्ये पूर्वी सांगितले गुण असून नम्रता आणि दरबारी डौल हेही होते. राजा जेव्हां उगीच फार सत्ता करीत होता, तेव्हां त्याचा पक्ष मोडावयासाठी त्यानें बहुत यत्न केला; परंतु जेव्हां पार्लमेंट देशचे राज्य आणि धर्म हीं दोन्हीं बुडविणार असे त्यास समजले, तेव्हां त्यानें राजाचा पक्ष दृढ धरिला. आंतले आंत लढाई होऊ लागली तेव्हांपा- सून त्याची हुशारी आणि उमेद गेली. त्यासतें मोठें दुःख झाले, त्यामुळे शरीर सुकलें, तो त्याची आस्था क रीना, आणि मृत्यु लवकर यावा अशी इच्छा करूं लागला. तो आपले स्नेही मंडळींत बसला ह्मणजे बहुधा अगोदर कांहीं बोलत नसे, आणि एखादे वेळेस श्वास टाकून ह्मणे, "तह! तह ! "लढाईचे दिवशी सकाळीं तो बोलला कीं, मला आतां जीवाचा कंटाळा आला, ह्मणून मी आज संध्या- काळचे आंत प्राण सोडीन. असे बोलून लढाईंत गेल्यावर त्याचे पोटास गोळी लागून तो मरण पावला. त्याचा लेख, त्याची सभ्यता, प्रमाणिकपणा, आणि पराक्रम, या गुणांस जो मृत्यु योग्य तोच त्यास आला.