पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७१ केली. नंतर त्यास चांगली नेमणूक करून देऊन एल्बा या ठिकाणी त्याने राहावें, असें ठरविलें. त्याचे वायक्रोस एक मोठें राज्य दिलें, व तिचे मागें तिचा मुलगा रोम एथील राजा, त्यानें प्रिन्स आफ पाम या किताबाने त्याचा उपभोग घ्यावा, असे ठरविलें. असा बोनापार्ट याचा मोड झाला, ह्मणून फार संतोष पावून लोकांनी तीन रात्रीपर्यंत दिव्याची शोभा केली, तशी पूर्वी कधीं झाली नव्हती. पूर्वी एक फ्रेंच राजा कैद करून लंडन शहरास आ- णिला होता, परंतु फ्रेंच राजास शत्रूपासून आश्रय देऊन त्याचें राज्य सोडवून त्यास पुनः स्वदेशी पाठविण्याचा शुभ दिवस एप्रिल महिन्याचे २० वे तारिखेस आला. नंतर २३ वे तारिखेस तो फ्रेंच राजा लंडन शहरांतून निघून मोठ्या समारंभानें वाट चालून मे महिन्याचे ३ रे तारि- खेस पारीस शहरास गेला. तो दिवस स्वच्छ आणि निरभ्र होता, आणि त्या दिवशी लोकांस बहुत संतोष झा रात्री लोकांनी दिव्यांची मोठी शोभा करून लुईस १६ वा याचे पुलाजवळ दारुकामें लाविलीं. ला. जून महिन्याचे ६ वे तारिखेन रूशिया एथील एंप- रर, प्रशिया देशचा राजा, जनरल ब्लकर, डयार्क व दुसरे कित्येक मोठमोठे सरदार डोवर बंदरास उतरून दुसरे दिवशीं लंडन शहरास आले. तेथें नुकताच लु- इस राजाचा जसा सत्कार झाला होता, तसाच त्यांचाही झाला. राजपुत्र रीजंट यानें त्यांस वारंवार मोठमोठ्या मेजवान्या केल्या. त्यावरून इंग्लंड देशची समृद्धि यांचे लक्ष्यांत आली, आणि त्यांनी सर्व युरोप जुलुमापासून मुक्त