पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बोनापार्ट व त्याचे कुटुंब यास राज्याविषयों कांहीं अधि कार नाहीं; ह्मणून पूर्वी लोकांनीं व शिपायांनी ज्या शपथा घेतल्या आहेत त्या सुटल्या. पुढे राजा कोण करावा, याविषयों बहुत विचार होऊन शेवटीं बुब वंशांतील को- णी स्थापावा असे ठरलें. हें वर्तमान एंपएर आलेक्झांडर यास समजतांच, त्याने एकमत झालेले राजांचे नांवें ड्युक विसेंज्ञा याचे हस्तें बोनापार्ट यास निरोप सांगून पाठविला की, आपले मर्जीस येईल ती जागा सांगून तेथें आपले कुटुंबासहवर्तमान जाऊन राहावें. एप्रिल महिन्याचे १ ले तारिखेस वो- नापार्ट यानें फोर्टेब्लो एथील फौज आपलीच असे सम- जून तिची हजिरी घेतली; आणि माशल व जनराल त्यास ऐकावयाजोगे मोठ्यानीं वोलत असत; तथापि तो तिकडे लक्ष्यच देईना. ती फौजेची हजीरी संपल्यावर मार्शलने यानें वाड्यांत जाऊन पारीस शहरांत मोठा फेरफार झाला तो कळला काय ? असे त्यास विचारिलें. त्यास ते सर्व ठाऊक असतां मला कांहीं कळलें नाहीं, असें त्यानें स्वस्थ चित्तानें उत्तर केलें. नंतर मार्शलने याने त्यास पारीस शहरचीं छापलेली वर्तमान पत्रे दिलीं, तीं 'त्याने मोठें लक्ष्य दिल्यासारिखे करून वाचलीं; आणि कांही विचार करून आपण राज्य सोडून आपले मुलांस दिलें, असा कागद सहीकरून पारीस एथील कारभाऱ्यांस पाठविला. तो त्यांनी मोठ्या तिरस्कारानें अमान्य केला; ह्मणून त्याने एप्रिल महिन्याचे ६ वे तारिखेस आपण आपले वारिसदार यांस फ्रान्स व इटली या दोनही दे- शचे राज्यांविषयों संबंध नाहीं, असे कागदावर सही