पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६९ वाली इतके लोक होते. इतकी फौज घेऊन जोझप बो- नापार्ट (एंपरर याचा भाऊ) यानें बेविल याचे डोंग- रावर तळ दिला. त्या प्रसंगी फौजांचे जमावाचा पूर्ण विजय झाला; वेल्विल डोंगर प्रुशियन फौजेने मोठे शूर- पणाने साध्य केला, पार्टि खेडें बंदुकींचा हल्ला करून घेतलें, आणि शूर ब्लकर याने मामों यावर हल्ला सुरू केला. इतक्यांत मार्शल मामों यानें तहाचें निशाण देऊन निरोप पाठविला कीं, पूर्वी तुझी तहाचें निशाण पा- ठविलें होतें, तेव्हांचे काय बोलणे असेल तें ऐकावयास मी आतां सिद्ध आहे. त्यानें पारीस शहरचे बाहेरचे सर्व तळ उठवावयाचे करारानें लढाई चार तासपर्यंत बंद असावी, असे सांगून पाठविलें. ते त्याचें ह्मणणें कबूल केलें; व पुढे लवकरच पारीस शहरही जमलेले राजांचे स्वाधीन झालें नंतर रुशिया एथील एंपरर, प्रशिया एथील राजा, हे सर्व आपले मोठमोठे सरदार व फौज बरोबर घेऊन दोन प्रहरांचे सुमारें पारीस शहरांत शि रले, आणि तेथे तळ दिला. त्या वेळेस सर्व लोकांनीं संतो- षानें बहुतच उत्साह केला, तो ज्यांनी पाहिला असेल त्यां- च्या मात्र चांगला मनांत येईल. नंतर त्या एकमत झालेल्या राजांनी जाहीर केले की, यानंतर बोनापार्ट व त्याचे कुटुंबांतील कोणी पुरुष यांचा आमचा कांहीं संबंध नाहीं; व फ्रान्स एथील लोक जसी राज्य रीति कबूल करितील तशी आह्मी स्थापूं. या जा- हिरातीनंतर लोकांची सभा होऊन पुढे चांगला बस्त होई तंवपर्यंत कारभार पाहणारे नेमून त्यांत बेनिवेंटो याचा प्रिन्सटालिरा यास मुख्य केले. तेथें असें ठरलें कीं,