पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्पेन देशांतून बाहेर काढलेले फौजेचे सरदारपणावर जर्मनी एथून पाठविलें. आणि २४ वे तारिखेस तो आ- पली फौज पिरिनीज पाहाडांतून घेऊन चालला होता. दुसरे दिवशीं दोनहीं फौजांची गांठ पडून आगस्ट महि- न्याचे दुसरे तारिखेपर्यंत मोठें युद्ध झाले; आणि स्पेन देशाच्या त्या भागांतून पुनः शत्रू निघाले. आगस्ट महिन्याचे ३१ वे तारिखेस सर टामस ग्रेम याचे हाताखालचे ब्रिटिश व पोर्तुगीझ यांचे एके टोळीने सेंट सिवास्तियान यावर हल्ला केला, आणि आंतून तोफां-. चा मार चालला असतां, आणि वर चढावयास वाट नस- तांही बहुत उपाय करून सुमारे तीन तासांचे आंत तें घेतलें; आणि पुढे सप्टेंबर महिन्याचे १८ वे तारिखेस किलाही शत्रूनी स्वाधीन केला. तेव्हां सुमारे १८०० लोक रखवालदार होते, ते कैद झाले, व लढाईचें सामान वगैरे सर्व घेतलें. लार्ड वेलिंग्तन यानें आक्टोबर महिन्याचे ७ वे तारि खेस फ्रान्स देशांत लढाई केली, आणि नावार प्रांताची राजधानी पांपिलूना एथील किला हस्तगत झाल्यामुळे स्पेन देशचे त्या मुलुखांतून शत्रूचा अंमल नाहीं असा झाला. संन् १८१४ माहे जान्युआरी तारीख २५ ते दिवशीं राज्यांत चहूंकडून शत्रु शिरूं लागले होते, त्यांचा मोड करण्याकरितां बोनापार्ट आपले फौजेचा सरदारपणा कर- ण्यासाठी पारीस शहरांतून निघाला. त्याचे पूर्वी १० वे तारिखेस बर्थियर निघाला होता. त्यानें २४ वे तारिखेस राज्याचा कारभार दुसऱ्यानें आपले बायकोचे स्वाधीन