पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाजू सांपडे अशे ठिकाणी तळ देऊन राहिला. १८ वे तारिखेस एके फ्रेंच टोळीने ओस्मा एथें जनरल ग्रेम यावर व दुसरीनें सेंटमिलन एथें बारन डाल्टन यावर हल्ला केला, परंतु दोनही टोळ्यांचा मोड झाला. १९ वे तारिखेस फ्रेंच यांची पिछाडी विटोरिया एथे मागे हटविली, आणि २१ वे तारिखेस एक मोठी लढाई झा ली; तीमध्यें जोझफ बोनापार्ट व मार्शल जुर्डी हे असतांही त्यांचा अगदी मोड होऊन त्यांस आपल्या सर्व तोफा, दा- णा, बुणगें व गुरे हे सर्व टाकून पळून जावे लागलें. एकशे एकावन्न तोफा, व चारशे पंध्रा सामानाच्या गाड्या लढाईत घेतल्या; आणि मार्शल जुर्डी याचा अधिकाराचा सोटा सांपडला. फौजांचे जमावांतून सातशे मेले, आणि चार हजार जखमी झाले; परंतु फ्रेंच यांचे यापेक्षा अधिक पडले. त्याच महिन्याचे २३ वे तारिखेस जनरल ग्रेम व लुगां यांस शत्रूंस धरावयाकरितां पाठविले. त्यांनी २५ वे ता- रिखेस टोलोसा शहराने बहुत टिकाव धरिला असतांही तें घेतलें. २६ वे तारिखेस सर रौलंड हिल यानें पां- पिलुना एथे तळ दिला. आणि जुलै महिन्याचे १२ वे तारिखेस जनरल ग्रेम यानें सेंट सिवास्तियन यावर हला केला. या दुसरे ठिकाणचें ठाणें तंटसहित त्यानें १७ वे तारिखेस घेतलें; आणि २५ वे तारिखेस किल्या- वर हल्ला केला. परंतु तट जेथें पाडिला होता, त्या ठि काणीं तोफांचा भडमार इतका होता की, शेवटीं एक हजार दोनशे सत्तर लोक मरून ब्रिटिश फौज मागे हटली. जुलै महिन्याचे पहिले तारिखेस मार्शल सुल्ट यास