पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

1 सुमारे दोन हजार लोक रखवाली होते. दुसरे दि- वशीं फ्रेंच यांनी जनरल मरे याचे हाताखालचे फौजांचे जमावावर हल्ला केला, परंतु तो रात्र होई तोपर्यंत दर पा- ऊल राखीत राखीत शेवटीं मागें फिरला. १३ वे ता- रिखेस फ्रेंच याचा मोड होऊन ते विलेना यास व ते- थून फुएंटला हिगेरा एथे गेले. नंतर आलिंक्यांट एथें कांहीं वेळपर्यंत निरुद्योगी राहून सर जान मरे यानें आपले लोक एक स्पानिश टोळी व तोफखाना गलबतांवर चढवून ४ थे तारिखेस तेरा हजार पायदळ व कांहीं स्वारांसहित तो टारानोगा याचे शेजारी पोंचला. वे तारिखेस फोर्टसान फिलिप, लफ्टेनंट कर्नल प्रिवोस्त याचे हाताखालचे एके टोळीचे एक मोठें मजबूद ठिकाण हस्तगत झाले; परंतु १२ वे तारिखेस सुषे आपणावर येतो, अशी बातमी ऐकून सर जान मरे मोठ्या लरेनें आपल्या तोफाही न घेतां वेढा उठवून निघून गेला. ७ जून महिन्याचे २ रे तारिखेस कर्नल ग्रांट याशीं व शत्रूंचं पिछाडीशीं स्वारांची लढाई झाली. तेव्हां लार्ड वेलिंग्तन डूरो नदीचे कांठावर टोर्स एथें होता. त्यानें दुसरे दिवशीं जनरल हिल याचे हाताखाली आपल्या लश्कराची उजवी बाजू डूरो नदीच्या पलीकडे उतर- विली, आणि जनरल गैरन याचे हाताखालची ग्यालि शियन फौज आपले डावे बाजूचे लश्कर जनरल ग्रेम याचे हाताखाली होतें, त्यास मिळविली. फ्रेंच यांचें पो- र्तुगल एथील व उत्तरेकडील जमलेले लश्कर यास मार्शल जुर्डी याचे हाताखालची मध्यदेशची फौज मिळून इब्रो नदीकडे चाललें; परंतु जनरल ग्रेम ती उतरून त्याची